Luv Ranjan : माझ्या चित्रपटात नेहमी महिलाच का असतात व्हिलन? सांगतोय स्वत: लव रंजन

दिग्दर्शक लव रंजनने आपल्या चित्रपटात नेहमी महिलाच खलनायीका का असतात? हे सांगितले आहे
Luv Ranjan
Luv RanjanDainik Gomantak
Published on
Updated on

दिग्दर्शक लव रंजन, जो त्याच्या आगामी थिएटरीयल रॉम-कॉम, 'तू झुठी मेै मक्कार' च्या रिलीजमध्ये व्यस्त आहे. लव रंजनच्या चित्रपटांवर नेहमी तो स्त्रीविरोधी असल्याचा आरोप केला जातो. शेवटी लव त्याने आपले मौन तोडले आहे की त्याच्या चित्रपटांमध्ये खलनायीका नेहमी स्त्रीच का असते?.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य जोडी असलेला तू झुठी मेै मक्कार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. हा लव रंजनचा त्याच्या शेवटच्या दिग्दर्शनाच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' नंतरच्या पाच वर्षांनंतरचा पहिलाच चित्रपट आहे, ज्यामध्ये खलनायीकाच्या भूमिकेत 'नुश्रत भरुच्चा' होती.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिग्दर्शक लव रंजन म्हणाला, “अजुनही काही फिल्ममेकर्स आहेत 'साधी मुलगी आणि चालू मुलगा' याच पॅटर्न मध्ये काम करत आहेत. (अन्यही दिग्दर्शक आहेत जे एका मुलीच्या विषयावर चांगले चित्रपट बनवत आहेत. त्रास आणि दुष्ट वर्ण म्हणून पुरुष). एक चित्रपट निर्माता म्हणून मला माझ्या चित्रपटांमध्ये आणि माझ्या प्रेक्षकांसाठी एक विशिष्ट नाविन्य असणे आवश्यक आहे.”

तो पुढे म्हणाला, "चित्रपटात जोपर्यंत एक नकारात्मक आणि एक सकारात्मक असणार नाही तोपर्यंत तो चित्रपट प्रेक्षकांना गुंतवुन ठेवणार नाही. माझ्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करणार्‍या स्त्रीला घेणे हा पूर्णपणे क्रिएटिव्ह निर्णय असतो".

Luv Ranjan
Besharam Rang : बेशरम गाण्यावर प्लस साईज मॉडेलचा डान्स, दीपिकाही झाली दिवानी

रणबीरच्या रोम-कॉमच्या शैलीत पुनरागमन करणाऱ्या 'तू झूठी मैं मक्कर'मध्ये स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी देखील आहेत.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आणि टी-सीरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी सादर केलेला हा चित्रपट, होळी, 8 मार्च 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहात दाखल होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com