Yogi Adityanath in Mumbai : योगी आदित्यनाथ बॉलिवूड 'यूपी'ला नेणार? म्हणाले...

बॉलिवूड बद्दल नेमकं काय म्हणाले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Yogi Adityanath
Yogi Adityanath Dainik Gomantak

Yogi Adityanath in Mumbai : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा सध्या चांगलाच गाजत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीगाठी आणि संजय राऊत यांची त्यांच्यावरची टीका असा हा दौरा सध्या सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची भेट योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे.

उद्योग क्षेत्रातल्या भेटी होत असताना मनोरंजन क्षेत्रातल्या अनेकांची भेट त्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. तर नोएडामध्ये उभारल्या जाणाऱ्या फिल्म सिटीबाबतही ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. योगी आदित्यनाथ मुंंबईत आलेत पण फिल्म इंडस्ट्री घेऊन जाऊ शकत नाही असं राऊत म्हणाले.

त्यांना हवं तर त्यांनी सिनेमाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा यामुळे देशाच्या विकासासाठी मदत होईल. जर ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आले असतील तर उद्योगपतींशी बोलावं असंही राऊत म्हणाले.

त्यांच्या या टीकेवर योगी आदित्यनाथ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. फिल्म इंडस्ट्रीच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार असल्याच्या चर्चा निरर्थक असल्याचे संकेत दिले आहेत.

Yogi Adityanath
Uorfi Javed :भगव्या रंगाचे शॉर्ट कपडे घालुन ऊर्फी जावेद बनली दिपीका.. व्हिडीओ एकदा पाहाच..

ते म्हणाले की, मुंबई ही मुंबईच आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेची भूमी आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेशला त्यांनी देशाची धर्मभूमी म्हटले आहे. पुढे उत्तर प्रदेशला त्यांनी देशाची धार्मिक राजधानी असल्याचं म्हटलं आहे.

आम्ही उत्तर प्रदेशमध्ये स्वत:ची फिल्मसिटी उभारणार आहोत, मुंबईमधून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही डाव किंवा विचार नाही" असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com