HBD Kangna : वाढदिवसाच्या निमित्ताने आई-वडिल, गुरू आणि निंदकांचीही आभारी...कंगनाने ट्विट्टरवर शेअर केला व्हिडिओ

अभिनेत्री कंगना रणौतने वाढदिवसानिमीत्य ट्विट्टरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अभिनेत्री कंगना रणौत सतत बातम्यांमध्ये चर्चेत असते. कित्येकदा कंगनाचे ट्विट्टर वॉर इतर सेलिब्रेटींसोबत सुरू असते. आता ट्विट्टरवर एक व्हिडीओ शेअर करत पुन्हा कंगना चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ कंगनाने स्वत: शेअर केला असुन त्यात ती काहीही वादग्रस्त बोललेली नाही.

या व्हिडीओमध्ये कंगनाने कोणावरही टीका केली नाही तर आज तिचा वाढदिवस असल्याने तिने आई-वडिल आणि आपल्या गुरूंना वंदन केले आहे.

व्हिडीओत कंगना साडीमध्ये दिसत असुन तिच्या आवाज अत्यंत सात्विकता दिसुन येत आहे. कंगनाचा नेहमीचा आक्रमकपणा या व्हिडीओत अजिबात दिसला नाही. व्हिडीओच्या सुरूवातीला कंगना म्हणते

"आज माझ्या वाढदिवसानिमित्य मी माझ्या आई-वडिलांना नमस्कार करते, माझे गुरू स्वामी विवेकानंद आणि सद्गगुरूजींनाही नमस्कार करते, त्याचबरोबर माझे फॅन्स, हितचिंतक यांचेही आभार मानते त्याचबरोबर माझ्या निंदकांचीही मी आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मला आळस येत नाही, आणि त्यांच्यामुळे मला मी यशस्वी असल्याचं कधी वाटत नाही अशा लोकांमुळेच मी लढायला शिकले आहे .

Kangana Ranaut
Anupam Mittal in Hospital: शार्क टॅंक अनुपम मित्तल हॉस्पिटलमध्ये? व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

मी नेहमी सर्वांच चांगलं व्हावं असाच विचार केला आहे म्हणुन मी बोलत असते आणि त्यामुळे कुणाला त्याबद्दल वाईट वाटलं असेल तर माफ करा जय श्रीकृष्ण... कंगना इतक्या सात्विक शब्दांत आणि शांतपणे बोलू शकते यावर बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही. पण ट्विट्टर हा व्हिडीओ एकदा जरूर बघा ..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com