Anupam Mittal in Hospital: 'Shark Tank India 2' टेलिव्हिजनवर आल्यापासून हेडलाइन बनत आहे. यात काही शंका नाही की सर्व शार्कने आता मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग मिळवले आहे आणि त्यांचे चाहते त्यांचे वैयक्तिक जीवन, आवडी आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
अनुपम मित्तल हा या शोच्या शार्कपैकी एक असून शोच्या लोकप्रियतेमुळे तो आता एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे.
मित्तल हे पीपल ग्रुपचे मालक आहेत आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म Shaadi.com चे संस्थापक आहेत. या व्यतिरिक्त, तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या चाहत्यांची संख्याही खूप आहे. नुकतेच अनुपमने शस्त्रक्रिया केल्याचं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
अनुपम मित्तल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करताना नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये, आपण त्याला हॉस्पिटलच्या बेडवर त्याच्या हाताला सपोर्ट बँडमध्ये गुंडाळलेले बघू शकतो.
व्हिडिओसोबत त्याने लिहिले की, 'जेव्हा मजला दूर जातो. अडथळे आणि नॉकआउट्सबद्दल आपण काही करू शकत नाही परंतु आपण काय करू शकतो… पुन्हा उठणे.
त्याने व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंटसचा वर्षाव केला. एका युजरने लिहिले 'मला वाटले शार्कला हाडे नसतात', तर एका फॅनने 'शार्क माणसांपेक्षा लवकर बरे होतात' अशी कमेंट केली. एक युजर लिहितो तुम्ही लवकरच उठून चालू व्हाल.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.