Kangana Ranaut on Pathan: "पठाणसारखे चित्रपट चालले पाहिजेत" चक्क कंगना रणौतने केलं 'पठाण'चं कौतुक..

सगळ्या बॉलिवूडशी उघड पंगा घेणाऱ्या कंगना रणौतने आता शाहरुख खानच्या पठाणचं तोंड भरून कौतुक केलं आहे
Kangana Ranaut
Kangana Ranaut Dainik Gomantak

Kangana Ranaut talk about Pathan अभिनेता शाहरुख खानचा पठाणने कालच्या दिवशी दिवसभर सगळी चर्चा आपल्याकडे खेचुन घेतली आहे.

शाहरुख खानच्या 'पठाण'ची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गर्दी होत असतानाच, चित्रपटाचा प्रचंड मोठा गट अजूनही चित्रपटाचा निषेध करत आहे.

 सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे कंगना राणौतने शाहरुख खानच्या या चित्रपटाचे कौतुक करत असे चित्रपट चालले पाहिजेत असे म्हटले आहे. कंगना राणौतने शाहरुखचं कौतुक करणं ही तशी मोठी गोष्ट म्हणायला हवी.

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 

शाहरुख खानचा हा अ‍ॅक्शन चित्रपट पाहण्यासाठी देशभरातून आणि जगभरातील चाहते चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. कंगना राणौतनेही शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले आहे.

खरं तर ती कंगनाच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाची रॅप अप पार्टी होती जिथे कंगनाने शाहरुखच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पठाण'बद्दल चर्चा केली. असे चित्रपट चालले पाहिजेत, असे कंगना म्हणाली.

शाहरुख खानच्या चित्रपटाचे कौतुक करताना कंगना म्हणाली, 'पठाण चांगली कमाई करत आहे. असे चित्रपट चालले पाहिजेत आणि मला वाटते की आपली हिंदी चित्रपटसृष्टी मागे राहिलेली माणसे, प्रत्येक व्यक्ती आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. 

अनुपम खेर यांनीही 'पठाण हा बिग बजेटमध्ये बनवलेला चित्रपट आहे.' सगळ्यात महत्त्वाचं हे की 'पठाण'चे बजेट जवळपास 250 कोटी आहे. असं म्हणुन आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Kangana Ranaut
Pathan Box Offive Collection: पठाण ठरला भारतातला सर्वात मोठा ओपनर...पहिल्या दिवशीच तोडला या चित्रपटाचा रेकॉर्ड...

'पठाण'च्या रिलीजवर सध्या जोरदार वादळ उठले आहे. एकीकडे शाहरुख खानचे चाहते हा चित्रपट पाहून त्याला पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या संख्येने लोक या चित्रपटावर बहिष्कार टाकत आहेत. पण चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने विक्रम केला आहे.

पहिल्या दिवसाच्या कमाईनेही लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 51 कोटींची कमाई केल्याचे सुरुवातीचे आकडे सांगत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com