Cannes Film Festivel : अन् कॅप्टन जॅक स्पॅरोसाठी सगळे टाळ्या वाजवत उभे राहिले....कान्समध्ये जॉनी डेपला स्टँडिंग ओवेशन व्हिडीओ व्हायरल

कान्स फिल्म फेस्टिव्हल अभिनेता जॉनी डेपसाठी सर्वांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या...
Cannes Film Festivel
Cannes Film FestivelDainik Gomantak

Johny Deap In Cannes Film Festivel : जगभरातल्या मनोरंजन विश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी अंबर हर्ड यांच्यातले बिघडलेले संबंध होते. दोघांचा कोर्ट रूम ड्रामाही बराच काळ रंगला होता. कित्येक काळाच्या आरोप- प्रत्यारोपानंतर हा वाद मिटला खरा ;पण तरीही जॉनी डेपला मात्र अगदी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या एन्ट्रीपर्यंत या गोष्टीचा सामना करावा लागला.

जॉनी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार की नाही इथपर्यंत चर्चा झाली. शेवटी जॉनी आला आणि त्याच्या चित्रपटाचं स्वागतही टाळ्यांच्या गजरात झालं.

जॉनी डेपने केली 15 व्या लुईची भूमीका

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्याच रात्री जॉनीच्या जीन डू बॅरी' चे स्क्रिनींग झाले. फ्रेंच चित्रपट निर्माती-अभिनेत्री मायवेनच्या या ऐतिहासिक ड्रामा फिल्ममध्ये जॉनी डेप 15 व्या लुईची भूमीका करत आहे.

जॉनी चित्रपटाच्या दिग्दर्शकासह, कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होता. यावेळी जॉनी रेड कार्पेटवर कोट , जांभळ्या रंगाचा सनग्लासेस आणि पोनीटेलमध्ये बांधलेले केस अशा रुपात दिसला.

जॉनीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत

59 वर्षीय जॉनी थिएटरमध्ये प्रवेश करताच उपस्थित सर्वांनी उभे राहून त्याचे स्वागत केले. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये लोकांच्या टाळ्यांच्या गजरात मायवेनचा हात धरून जॉनी गर्दीमध्ये स्क्रीनिंग हॉलमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसत आहे.

रेड कार्पेटवर चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले. मागील वर्षी आधीची पत्नी अंबर हर्डसह बिघडलेल्या संबंधांमुळे कान्सच्या उद्घाटनाने त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले जॉनीची सहअभिनेत्रीला जॉनी डेपच्या पुनरागमनाचं श्रेय देण्यात येत आहे.

#CannesYouNot हॅशटॅग असलेली एक नवीन सोशल मीडिया मोहीम सुरू असताना जॉनीला या मोहिमेचा सामना करावा लागला. अंबर हर्डच्या चाहत्यांनी जॉनीच्या या फेस्टिव्हलच्या सहभागाला विरोध केला होता.

Cannes Film Festivel
Sameer Wankhede Controversy : समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर; मॉडेलने केला गंभीर आरोप

या चित्रपटाने डेपने आधीची पत्नी एम्बर हर्डसोबतच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर तीन वर्षांच्या अंतरानंतर अभिनयात पुनरागमन केले आहे, हा खटला शेवटी जॉनीने जिंकला पण त्याची चर्चा फेस्टिव्हलच्या स्क्रिनींग हॉलपर्यंत झाली.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनींग झालेला जॉनीचा 'Jeanne du Barry' हा चित्रपट 15 वा लुई आणि त्याची प्रेयसी यांची गोष्ट सांगतो. आपल्या प्रेयसीने आपल्यासोबत राहावं म्हणून घालमेल होणाऱ्या राजाची गोष्ट या चित्रपटातून सांगितली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com