Social Media App Josh: जोश हे देशातील सर्वात लोकप्रिय शॉट व्हिडिओ ॲप्सपैकी एक आहे, ज्याचे देशभरात मोठ्या प्रमाणात यूजर्स आहेत. विशेष म्हणजे, जोशने क्रिएटर्संना भारतातील मोठा प्रेक्षक वर्ग उपलब्ध करुन दिला आहे. जोशने अनेकांचे जीवन बदलण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर, क्रिएटर्संना व्यक्त होण्यासाठी आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी जोश एक मोठे व्यासपीठ आहे.
अशीच एक क्रिएटर जिया मोरे आहे. ती अवघ्या ही सात वर्षांची आहे. जिया ही महाराष्ट्रातील मालेगाव येथील रहिवासी आहे. मार्च 2023 पासून जोशवर ती छोटे-छोटे व्हिडिओ बनवत आहे. विशेष म्हणजे, हे लक्षात घेण्यासारखे आहे की जिया तीन वर्षांपासून नृत्य शिकत आहे आणि जोशमध्ये सामील झाली तेव्हाही ती नृत्य शिकत होती. तिच्या वडिलांचा एक छोटासा व्यवसाय आहे. तर तिची आई एक गृहिणी आहे. जियाच्या आई वडिलांनी नेहमीच आपल्या मुलीच्या प्रतिभेला बळ देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जोशने तिला तिची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ दिले. प्लॅटफॉर्मवरील तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली. प्रेक्षकांनी तिला भरभरुन प्रेम दिले. तिच्या कुटुंबाच्या सततच्या पाठिंब्याव्यतिरिक्त, जोशच्या प्रेक्षकांकडून तिला डान्स शोसाठी करण्याची प्रेरणा मिळाली. "जिया तू एक डान्स रिॲलिटी शो जिंकू शकतेस... तुमची जिया एक सुपरस्टार आहे" असे मेसेज तिला डान्स शोचे ऑडिशन देण्यासाठी प्रेरित करत होते.
दुसरीकडे, जियाने झी मराठीवरील डीआयडी लिल मास्टर, डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भाग घेतला आणि फर्स्ट रनर अपचा पुरस्कारही जिंकला. डान्स शोबद्दलचा तिचा अनुभव सांगताना ती म्हणाली की, "डान्स महाराष्ट्र डान्समधील अनुभव हा खूप काही शिकवणारा होता. यादरम्यान मला खूप काही शिकायला मिळाले आणि प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केले. त्यांना माझा डान्स आवडला आणि मला इतका सपोर्ट केला की संपूर्ण देशभर मला एक उत्तम डान्सर म्हणून ओळख मिळाली.''
जिया तिच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणाबद्दल सांगताना म्हणाली की, ''झी टीव्हीच्या दक्षिण भारतातील डान्स शोच्या मोठ्या मंचावर मी गेले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की त्यामध्ये मी टॉप टेनमध्ये आले. विजेत्या मास्टर मारजीने मला मोठी ट्रॉफी दिली. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. विशेष म्हणजे, माझ्या आई-वडिलांचे हे स्वप्न होते."
दरम्यान, जियाने मध्य प्रदेशातील मनोरमा चॅनल शो- किडलम शो आणि इंडिया डान्स पॉवर 9xm चॅनल देखील जिंकले. बॉलीवूडमधील सर्वोत्तम कोरिओग्राफर बनण्याचे जियाचे स्वप्न आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.