Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: क्रिती-शाहिदचा बॉक्स ऑफीसवर नवा रेकॉर्ड

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: तर नवीन रिलीज झालेला चित्रपट 'कुछ खट्टा हो जाए' काही कमाल दाखवू शकला नाही.
Shahid Kapoor- Kriti Senon
Shahid Kapoor- Kriti SenonDainik Gomantak
Published on
Updated on

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: शाहीद कपूर आणि क्रिती सेनॉनचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाल केली आहे. चित्रपट रिलिज झाल्यानंतर १० दिवसात २०२४ मध्ये १०० कोटीच्या घरात पोहचणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 2024 मधील हा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. इतकेच नाही तर भारतीय बॉक्स ऑफिसवर वर्षातील पहिला हिट चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे.

रविवारी, चित्रपटाने पुन्हा एकदा पहिल्या दिवसाइतकी तिकिटांची विक्री केली. दुसरीकडे, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फाइटर'च्या कमाईतही वीकेंडला मोठी कमाई होताना पाहायला मिळाली आहे. तर नवीन रिलीज झालेला 'कुछ खट्टा हो जाए' काही कमाल दाखवू शकला नाही.

७५ कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. इतर चित्रपटांपेक्षा हटके असलेल्या शाहीद आणि क्रितीच्या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केल्याचे पाहाला मिळाले आहे. बदलत्या काळात रोबोटची भूमिका आणि माणूस रोबोटच्या प्रेमात पडल्याची ही गोष्ट आहे. त्यामुळे एक हटके गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे. याबरोबरच यातील गाणादेखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'तेरी बातों का ऐसा उल्झा जिया' ने रविवारी 10 व्या दिवशी देशभरात 6 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. अशाप्रकारे देशातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन 58.2 कोटी रुपये झाले आहे. एक दिवस आधी शनिवारी या चित्रपटाने 5 कोटींची कमाई केली होती, तर पहिल्या दिवशी 6.7 कोटींचा व्यवसाय केला होता. पहिल्या आठवड्यात 44.35 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, शाहिद आणि क्रितीच्या या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये 13.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

2024 मध्ये 'फाइटर' नंतर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा जगभरात १०० कोटींची कमाई करणारा दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. रविवारी या चित्रपटाने जगभरात 8.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण कमाई आता 100.85 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने परदेशात 10 दिवसांत 31.00 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com