प्रियांका चोप्राने सोशल मीडियावरुन 'जोनास' नाव काढण्याचे सांगितले कारण!

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या सोशल मीडियावरून जोनास आडनाव काढून टाकल्याबद्दल मीडियामध्ये अनेक चर्चा सुरू होत्या.
Priyanka Chopra explains the reason for removing Jonas surname from social media

Priyanka Chopra explains the reason for removing Jonas surname from social media

Dainik Gomantak

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या सोशल मीडियावरून जोनास आडनाव काढून टाकल्याबद्दल मीडियामध्ये अनेक चर्चा सुरू होत्या. प्रियांका चोप्राने इन्स्टाग्राम अकाउंटवरून जोनास आडनाव काढून टाकल्याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका चोप्राने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जेव्हा तिला समजले की सोशल मीडियावरून आडनाव काढून टाकण्यावरून इतका गोंधळ झाला आहे, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. जोनास आडनाव काढून टाकल्याबद्दल प्रियांका चोप्रा म्हणाली, 'मला माहित नाही, कदाचित मला माझ्या ट्विटर अकाउंटशी युजरनेम जुळवायचे होते.'

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जोनास आडनाव काढून टाकल्याबद्दल म्हणाली की, 'हे फक्त सोशल मीडिया आहे आणि नेटिझन्सने खरोखर शांत होण्याची गरज आहे. मला आश्चर्य वाटले की इथली प्रत्येक गोष्ट लोकांसाठी इतकी मोठी बनते. हे फक्त सोशल मीडिया आहे, जस्ट चिल आउट'.

<div class="paragraphs"><p>Priyanka Chopra explains the reason for removing Jonas surname from social media</p></div>
'राउडी राठौर'च्या सिक्वेलमध्ये अक्षयचा दिसणार राऊडी अंदाज?

प्रियंका चोप्राने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास (Nick Jonas) आडनाव काढून टाकले आहे. प्रियांका चोप्राच्या सोशल मीडिया अकाउंटवर, तिचे यूजरनेम प्रियांका चोप्रा जोनास होते, जे अभिनेत्रीने बदलून प्रियांका चोप्रा केले. यानंतर सोशल मीडियावर अशी जोरदार चर्चा सुरू होती की प्रियांका आणि निक जोनासमध्ये काहीतरी बरोबर नाही आणि दोघे वेगळे होणार आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या नात्याबाबत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या आईनेही प्रियांका चोप्रा आणि निक यांच्या नात्याबाबत एक वक्तव्य केले होते. प्रियांकाच्या आईने सांगितले होते की, दोघांचे नाते पूर्णपणे चांगले आहे आणि या सर्व गोष्टी निरुपयोगी आहेत. यासोबतच अभिनेत्रीच्या आईनेही अफवा पसरवू नका असे आवाहन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com