Jasmin Bhasin : ट्रोलिंग, अफवा आणि बलात्काराच्या धमक्या...जास्मिन भसीन पहिल्यांदाच बोलली 'डिप्रेशन'बद्दल...

बिग बॉस फेम जास्मिन भसीन सध्या सोशल मिडीयावर चर्चेत असुन तिच्या अलीकडच्या रिलीज झालेल्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Jasmin Bhasin
Jasmin BhasinDainik Gomantak

बिग बॉस फेम अभिनेत्री जास्मिन भसीन सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणाच चर्चेत आहे. जास्मिनने तिला होणाऱ्या ट्रोलिंग आणि बलात्काराच्या धमक्यांबद्दल सांगितल्यानंतर आता तिच्या चाहत्यांनाही तिची काळजी वाटत आहे, चला पाहुया नेमकं काय घडलंय जास्मिनच्या बाबतीत.

जास्मिनला बलात्काराच्या धमक्या

जस्मिन भसीन नुकतीच बॉयफ्रेंड अली गोनीसोबत थायलंडच्या दौऱ्याहून परतली आहे. सोशल मिडीयावर त्या अलीकडच्या गाण्यांवरही त्याची भरभरून प्रशंसा होत आहे. 

दरम्यान, जास्मिन भसीनने खुलासा केला आहे की तिच्या रंगावरुन, अलीसोबतच्या तिच्या संबंधांवरुन आणि इतर अनेक गोष्टींमुळे तिला दररोज ट्रोल केले जाते. 

काही ट्रोलर्स तिला बलात्काराच्या धमक्याही देतात तेव्हा संयम संपतो. या प्रकारानंतर आता जास्मिननेही ट्रोलिंगला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे.

जास्मिनला डिप्रेशनचा सामना करावा लागला

नुकतंच जास्मिन भसीनने एका यूट्यूब चॅनलशी झालेल्या संवादात काही गोष्टी शेअर केल्या आहेत, जास्मिन म्हणते तिला दररोज तिरस्कार करणाऱ्यांकडून अश्लील कमेंट्स आणि मूर्खपणाच्या कमेंट्सचा सामना करावा लागतो. 

जास्मिनने सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींमुळे आयुष्यात पहिल्यांदाच तिला नैराश्याचा सामना करावा लागला. तिने सांगितले की तिला ट्रोलिंगचा सामना कसा करावा लागला?

जस्मिन भसीन म्हणाली, “बिग बॉस 14 नंतर मला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक मर्यादा ओलांडणाऱ्या द्वेष करणाऱ्यांच्या मूर्खपणाची ही मर्यादा ओलांडली आहे. यामुळे मी देखील डिप्रेशनमध्ये गेले.

लोक द्वेष का करतायत?

मुलाखतीत बोलताना जास्मिन पुढे म्हणाली, 'मला अनेक चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. पण काही लोक शिव्याही देतात. मला समजत नाही की मी जे मिळवले आहे त्याबद्दल माझा तिरस्कार का केला जात आहे?. 

एक वेळ अशी आली की मला खूप काळजी वाटायला लागली. या सर्व कारणांमुळे मी आयुष्यात पहिल्यांदाच डिप्रेशनमध्ये गेले. हे लोक मला बलात्काराच्या धमक्या देत होते. ते मला अशा घाणेरड्या नावांनी हाक मारायचे जे मी याआधी कधी ऐकलंही नव्हतं.

Jasmin Bhasin
Godzila Trailer : सावधान ! पुन्हा धडकी भरवायला येतोय 'गॉडझिला'..धमाकेदार ट्रेलर एकदा बघाच

स्वत:ची अशी समजूत काढली

पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलेल्या जस्मिनने सांगितले की अली गोनीला डेट केल्यामुळे आणि तिच्या सावळ्या रंगामुळे काही लोक तिचा तिरस्कार करतात अगदी तिला शिव्याही देतात. एक वेळ अशी आली की या नकारात्मक गोष्टी तिच्यावर वर्चस्व गाजवू लागल्या. 

पण नंतर जास्मिनने स्वतःची समजूत काढली. ती म्हणाली, 'मग मी स्वतःला समजावून सांगितले की हे लोक कोण आहेत. त्यांची ओळख नाही. या गोष्टींमुळे मला स्वतःला त्रास करुन घेण्याची गरज नाही.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com