Godzila Trailer : सावधान ! पुन्हा धडकी भरवायला येतोय 'गॉडझिला'..धमाकेदार ट्रेलर एकदा बघाच

हॉलीवूडमधल्या मोजक्या आणि नेमका परिणाम साधणाऱ्या चित्रपटांपैकी एक असणारा गॉडझिला आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचं ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Godzila Trailer
Godzila TrailerDainik Gomantak

Godzila Trailer Relese on Youtube : हॉलीवूडमध्ये ज्या काही थरारक आणि रोमांचकारी अनुभव देणाऱ्या चित्रपटांनी जगभरातल्या प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला त्यात गॉडझिलाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

स्पायडर मॅन, जुमानजी, बॅटमॅन, मार्वल सिरीज या मालिकेतला सर्वात आधीचा चित्रपट म्हणजे गॉडझिला. आता हा चित्रपट नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

VFX चा भन्नाट अनुभव

'गॉडझिला मायनस वन'चा ट्रेलर TOHO ने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज केला आहे. जपान आणि अमेरिकेत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. याआधीही गॉडझिलाने प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळवले आहे. 

यामध्ये प्रेक्षकांना दमदार VFX चा अनुभव मिळणार आहे. रिलीजच्या तारीख आणि चित्रपटांच्या कलाकारांविषयी चला जाणून घेऊया.

दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट

'गॉडझिला मायनस वन' या लाईव्ह-अॅक्शन चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज झाला आहे. तमासी यामाझाकी यांनी या अॅक्शन आणि व्हीएफएक्स-पॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

चित्रपटात गॉडझिलाने केलेल्या विध्वंसाची दृश्ये आहेत तुम्हाला थक्क करतील हे नक्की. हे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगावर आधारित आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार चला पाहुया.

गॉडझिला मायनस वन ट्रेलरमध्ये तुम्हाला पुन्हा तो रोमांचकारी अनुभव मिळेल. ट्रेलरची सुरूवात लोकांच्या सैरावैरा पळण्यापासून होते. एका शहरात भयभीत झालेली माणसं रस्त्यावरुन पळताना दिसतात.

त्यानंतर एका ट्रेनच्या ट्रॅकवर एक भयंकर वस्तू येऊन पडते. पुढच्याच फ्रेममध्ये अजस्त्र असा गॉडझिला इमारती आणि माणसांना चिरडत येताना दिसतो.

महायुद्धानंतर जपानच्या लोकांना किती अडचणींचा सामना करावा लागला याचंही चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे. अनेक अडचणींचा सामना करताना एक नवा राक्षस त्यांच्यासमोर मोठं संकट बनुन उभं असताना लोक त्याच्याशी कसं लढतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

तमाशीने चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन तसेच व्हीएफएक्सची जबाबदारी घेतली आहे. हा चित्रपट 33वा जपानी भाषेतील गॉडझिला चित्रपट आहे आणि एकूण 37 वा चित्रपट आहे. 'Godzilla Minus One' हा 2016 च्या हिट 'शिन गॉडझिला' नंतर गॉडझिला दाखवणारा पहिला थेट-अ‍ॅक्शन जपानी चित्रपट आहे.

रिलीजची डेट

हा जपानी चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी यूएसमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट IMAX, 4DX आणि MX4D मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी जपानमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 36 व्या टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शेवटचा चित्रपट म्हणूनही चित्रपटाचा प्रीमियर होईल. या चित्रपटाची उत्सुकता जगभरातल्या गॉडझिलाच्या चाहत्यांना लागुन राहिली आहे हे नक्की.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com