Jiah Khan Suicide Case Verdict: अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला अभिनेता सुरज पांचोलीला अखेर सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
या प्रकरणाला 10 वर्षे लोटली असुन अखेर या प्रकरणात सुरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे.
3 जून 2013 रोजी ही अभिनेत्री जिया खान मुंबईतील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. या घटनेने बॉलिवूडसह देशभरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता सुरज पांचोली याच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर जिया खानची आई राबिया खान यांनीही सुरजवर गंभीर आरोप केले होते.
गेल्या 10 वर्षांपासुन सुरू असलेल्या या केसचा आज निकाल लागणार होता त्यामुळेच या केसची जोरदार चर्चा सुरू होती आणि अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) न्यायालय शुक्रवारी अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी निकाल दिला आहे.
पण या निकालाविरोधात आता जिया खानची आई राबिया खान उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या मुलीचा खून झाला आहे या मुद्द्यावर राबिया खान ठाम असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं..
गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याचा निकाल २८ एप्रिलला राखून ठेवला होता.
आज अखेर हा निकाल सूरज पांचोलीच्या बाजुने दिला आहे. पण यावर वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा जिया खानची आई राबिया खान यांना देण्यात आली आहे. हा आत्महत्या प्रकरणाचा खटला गेली 10 वर्षे सुरू आहे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.