Jio Cinema's New Facility: काय सांगता ! OTT वर उपलब्ध नसणारा कंटेट आता जिओ सिनेमावर पाहता येणार?

मनोरंजन विश्वातुन एक अत्यंत महत्त्वाची बातमी येतेय आणि चित्रपट रसिकांसाठी ही खुशखबर असणार आहे.
Jio Cinema's New Facility
Jio Cinema's New FacilityDainik Gomantak
Published on
Updated on

Jio Cinema's New Facility: आपल्याला हवा असणारा कंटेट ओटीटीवर उपलब्ध नसल्याने नाराज होणाऱ्या प्रेक्षकांसाठी आता एक खुशखबर आली आहे.

Reliance Jio-मालकीच्या कंपनीने एक मोठा करार केला आहे जो OTT प्लॅटफॉर्म Netflix, Amazon आणि Disney Plus Hotstar यांना मोठा धक्का देणार आहे. 

Viacom18 ने HBO, Max Originals आणि Warner Bros सोबत अनेक वर्षांचा करार केला आहे, ज्यानंतर त्यांच्याशी संबंधित कंटेट थेट भारतातील Jio सिनेमावर पाहता येईल.

यापूर्वी, युजर्स डिस्ने प्लस हॉटस्टारवर HBO शी संबंधित कंटेट पाहू शकत होते, परंतु कंपनीने 31 मार्च रोजी HBO सोबतचा करार रद्द केला. 

या सिरीज जिओ सिनेमावर पाहता येणार

या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, युजर जिओ सिनेमावर एचबीओ वरचा कंटेट हाउस ऑफ द ड्रॅगन, द लास्ट ऑफ अस, सॅक्सेशन आणि द व्हाईट लोटस इत्यादी स्ट्रीम करू शकतील. 

याशिवाय गेम ऑफ थ्रोन्स, बिग लिटल लाईज, चेरनोबिल आणि वीप इत्यादी प्रसिद्ध सिरीज ज्या एचबीओवर प्रचंड चालल्या आहेत त्या आता जिओवर पाहता येतील. 

Game of Thrones
Game of Thrones Dainik Gomantak

मोठ्या OTT प्लॅटफॉर्मला बसणार धक्का

रिलायन्सच्या या नव्या प्लॅनमुळे, Netflix, Amazon आणि Disney Plus Hotstar सारख्या प्रसिद्ध OTT स्ट्रीमिंग अॅप्सना युजरबेसच्या बाबतीत मोठा धक्का बसू शकतो कारण वॉर्नर ब्रदर्स आणि HBO च्या कंटेटला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळतो. 

रिलायन्सने आधीच जिओ सिनेमावर टाटा आयपीएल आणून इतर OTT अॅप्सना मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे साहजिकच हा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी मोठा धक्का असणार आहे.

Chernobyl
ChernobylDainik Gomantak

इतके पैसे द्यावे लागणार

अलीकडेच असे वृत्त आले होते की रिलायन्स जिओ सिनेमासाठी सशुल्क सदस्यता जाहीर करू शकते. कंपनी तीन प्रकारचे प्लॅन तयार करण्यावर काम करत आहे आणि या अंतर्गत यूजर्स विविध कंटेंट ऍक्सेस करू शकतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी Jio सिनेमासाठी 2 रुपये, 99 रुपये आणि 599 रुपयांचे प्लॅन आणू शकते. यासाठी जिओच्या पेड फॅसिलिटीचे नाव जिओ प्रीमियम असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com