"जिथे जात, धर्म, द्वेष पैसा नाही तिथे..." मुलीच्या मृत्यूनंतर संगीत दिग्दर्शक विजय अँटोनीची हृदयद्रावक प्रतिक्रिया...
Vijay Antony's Daughter Passes Away: 19 सप्टेंबर रोजी मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी एक दु:खद घटना घडली.
चेन्नई येथे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विजय अँटोनी यांच्या मुलीने आत्महत्या केली. या घटनेचे वृत्त समजताच मनोरंजन विश्वासह विजय यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला.
विजय अँटोनी खचले
विजय यांची मुलगी मीराच्या मृत्यूनंतर ते पुरते खचले आहेत. X ( पुर्वीचे ट्विट्टर) वर विजयने लिहिलेल्या एका हृदयद्रावक पोस्टनंतर ते सध्या कोणत्या मानसिक अवस्थेत आहेत याची कल्पना येऊ शकते.
आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार केल्याच्या एका दिवसानंतर, विजयने त्याचे हृदयद्रावक विधान शेअर केले. एका वडिलांचे मुलीशी असलेलं नातं किती घट्ट असु शकतं हे या पोस्टमधुन समजू शकतं.
विजय अँटोनीची पोस्ट
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार , विजय अँटोनी यांच्या तमिळमधील पोस्टचे भाषांतर असे केले आहे, "तुम्ही सर्व दयाळू लोकांनो, माझी मुलगी मीरा खूप प्रेमळ आणि धाडसी आहे.
ती आता जातीशिवाय असणाऱ्या एका चांगल्या आणि शांत ठिकाणी गेली आहे, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि सूड या सगळ्यापासून दूर. ती अजूनही माझ्याशी बोलत आहे.
विजय पुढे लिहितात
आपल्या या भावनिक पोस्टमध्ये विजय अँटोनी पुढे लिहितात, “तिच्यासोबत माझा मृत्यू झाला आहे. मी आता तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली आहे. यापुढे मी तिच्या वतीने जी काही चांगली कामे करीन, ती तिच्याकडूनच केली जाईल.
पहाटे मीराचा मृत्यू
19 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता विजय अँटोनी यांची मुलगी तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. अभिनेते आणि संगीतकार यांनी तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, जिथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
अनेकांनी शोक व्यक्त केला.
मीरा चेन्नईतील एका खाजगी शाळेत शिकली. ती शाळेतील एक उत्तम बालकलाकार होती आणि शाळेच्या सांस्कृतिक विभागाची प्रमुख होती.
मीराच्या आकस्मिक निधनाने तिच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या निधनानंतर तमिळ चित्रपट उद्योगातील अनेकांनी विजय आणि कुटुंबियांना शोक व्यक्त केला .
जयम रवी यांचं ट्विट
अभिनेते जयम रवी यांनी ट्विट केले होते की, “तुमची मुलगी @vijayantony गमावल्याचं ऐकून मन हेलावलं. तिथल्या सर्व मुलांसाठी, कृपया हे जाणून घ्या की तुम्ही प्रेमळ आहात, मूल्यवान आहात आणि कधीही एकटे असणार नाही.
आम्ही फक्त तुमच्या आनंदासाठी आणि प्रेमासाठी जगत आहोत. जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, आणि तुमच्यात आव्हानांवर मात करण्याची ताकद आहे… काहीही असो, पालकांसोबत शेअर करा, आम्ही तुमच्यासाठी त्याचा सामना करण्यासाठी आहोत. मीराला RIP करा.
मीराच्या आईच्या वेदना
मीरा ही विजय आणि पत्नी फातिमा यांची मोठी मुलगी होती. 16 वर्षीय मीरावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थानिक मीडिया हाऊस थंथी टीव्हीनुसार , तिच्या मुलीला निरोप देताना तिची आई फातिमा अंत्यसंस्काराच्या वेळी रडून रडली . ती म्हणाली, "मी तुला गर्भात वाहून घेतले आहे... तू मला किमान एक शब्दतरी बोलू शकला असतीस."