Nayantara- Atalee : नाराजीच्या चर्चेनंतरही नयनताराने ॲटलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...

गेल्या दोन दिवसांपासून जवानफेम अभिनेत्री नयनतारा चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटलीवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तरीही आज ॲटलीच्या वाढदिवसानिमित्त नयनताराने ॲटलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Nayantara- Atalee
Nayantara- AtaleeDainik Gomantak
Published on
Updated on

Nayanthara Wishesh Atlee on his Birthday : गेल्या दोन दिवसांपासुन जवान फेम अभिनेत्री चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटलीवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अशी चर्चा असली तरीही आज ॲटलीच्या वाढदिवसानिमित्त नयनताराने त्याला शुभेच्छा देऊन चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे.

नयनतारा आणि ऍटली यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरू असताना , जवानच्या लीड ॲक्ट्रसने अर्थात ब्यूटी क्वीन नयनताराने ॲटलीला त्याच्या 37 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भूमिकेसमोर तिला 'लक्षणीयपणे बाजूला काढणे' हे कथित फॉलआउटचे कारण होते 

ॲटली आणि नयनतारा

ॲटलीला शुभेच्छा देण्यासाठी नयनताराने 21 सप्टेंबर रोजी इंस्टाग्राम स्टोरीवर जवानच्या सेटवरील फोटोंचा कोलाज पोस्ट केला. या फोटोत ती ॲटलीसोबत दिसत आहे. या फोटोत ॲटली दिग्दर्शन करताना दिसत आहे.

 एका फ्रेममध्ये दोघेही स्पष्ट हसताना दिसत आहेत. जवानच्या सेटवरील या दृश्यात नयनतारा आणि ॲटली सीन पाहताना दिसत आहेत.

दोन दिवसांपासून चर्चेत असलेली नयनताराची नाराजी खरी की खोटी असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. नयनतारा ॲटलीवर नाराज होती कारण दीपिका पदूकोणसाठी तिचा रोल कापला गेला असं नाराजीमागचं कारण असल्याचीही चर्चा होती.

 जवान चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ₹ 500 कोटी आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹ 900 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

Nayantara- Atalee
Nayantara- AtaleeDainik Gomantak

नयनतारा खुश नव्हती कारण

जवान चित्रपटात मुख्य अभिनेत्री नयनतारा होती. दीपिका पदूकोणचा चित्रपटात कॅमिओ होता. पण चित्रपट पाहताना तो अजिबात कॅमिओ नव्हता अशी प्रतिक्रिया नयनताराने दिल्याचे बोलले जात आहे.

 जवान हा जवळपास शाहरुख-दीपिकाचाच चित्रपट वाटत होता. नयनतारा ही दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री आहे आणि म्हणूनच ती जवानमध्ये मिळालेल्या वागणूकीने खूश नव्हती. 

Nayantara- Atalee
Akhil Mishra : 'थ्री इडियट्स'मधले लायब्ररीयन दुबे अर्थात अखिल मिश्रा काळाच्या पडद्याआड... त्यांच्या या गोष्टी माहितेयत का?

ॲटली आणि नयनताराचं यापूर्वीचं काम

याआधी गुरुवारी शाहरुखने दीपिकासोबत जवान मधील डान्स नंबर शेअर करून ऍटलीला X (पूर्वीचे ट्विटर) वर शुभेच्छा दिल्या.

नयनताराने ॲटलीने दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2013 मध्ये ॲटलीचा दिग्दर्शनाचा पदार्पण चित्रपट राजा राणीमध्ये लीड रोल केला होता. मग त्यांनी जवानसाठी पुन्हा एकत्र येण्यापूर्वी ॲटलीच्या दिग्दर्शनाखाली स्पोर्टस ड्रामा बिगिल (2019) वर एकत्र काम केले.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com