
हृतिक रोशनसारखा दिसणारा एक अभिनेता मध्यंतरी काही काळ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काही काळ असं म्हणण्याचं कारण म्हणजे हा अभिनेता आणि त्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरु शकले नव्हता; पण अभिनेता हा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र यशस्वी ठरला आहे. आज आपण बोलतोय अभिनेता हरमन बावेजाबद्दल.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता हरमन बावेजा आणि साशा रामचंदानी या कपलने एका क्यूट बाळाला जन्म दिला आहे. त्यांचं हे पहिलंच बाळ असुन साहजिकच बाळाच्या जन्मानंतर हरमन बावेजा आणि त्याची पत्नी खुष आहे.
2021साली हरमन बावेजा विवाहबद्ध झाला होता. हरमन बावेजाने आपल्या करिअरची सुरुवात 2008 सालच्या 'लव स्टोरी 2050' या चित्रपटापासुन केली होती, हा चित्रपट काही विशेष कमाल दाखवु शकला नव्हता. यात हरमनसोबत प्रियांका चोप्रा दिसली होती. यानंतर अमृता रावसोबत त्याचा 'विक्ट्री' हा चित्रपट आला होता.
यानंतर हरमन बावेजाचा 2009 साली 'व्हॉट्स युवर राशी' हा शेवटचा चित्रपट आला होता. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा दिसली. पण हाही चित्रपट काही विशेष कमाल करु शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार 22 डिसेंबरला म्हणजे कालच्याच दिवशी हरमनच्या बाळाचे आगमन झालं. हरमनची पत्नी साशा एक न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन म्हणुन काम करते. करिअरच्या सुरूवातीलाच हरमनचं नाव अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत जोडलं गेलं. त्यानंतर काही काळ हरमनच्या बिपाशासोबतच्या बातम्या येत राहिल्या ;पण बिपाशाने या गोष्टी अफवा असल्याचं सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.