Mission Imposible 7: हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ (Tom Cruise) हा त्याच्या अभिनयासह उत्कृष्ट अॅक्शन दृश्यांसाठी ओळखला जातो. सध्या टॉम त्याचा आगामी चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल 7'ची तयारी करत आहे, हा चित्रपट पुढील वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी त्याने त्याचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक स्टंट केला आहे. विशेष म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षी टॉमने हे स्टंट केले आहेत.
'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ टॉम क्रूझने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टॉम आणि त्याची टीम अनेक महिन्यांपासून या धोकादायक स्टंटची तयारी करताना दिसत आहे. या चित्रपटातील एका दृश्यासाठी टॉमला पूर्ण वेगाने दुचाकी चालवत डोंगरावरून उडी मारावी लागते. केबलच्या मदतीने तो हा स्टंट करत आहे, मात्र हा स्टंट अतिशय धोकादायक आहे. याचा सराव करण्यासाठी त्याने 500 वेळा स्कायडायव्हिंग केले आणि 13 हजार पेक्षा जास्त वेळा मोटोक्रॉस जंप केले. या दृश्याच्या शूटिंगसाठी मोठा पूल तयार करण्यात आला होता. दररोज हेलिकॉप्टरने उंच डोंगरावर पोहोचून टीमने तयारी केली.
या व्हिडीओमध्ये टॉम क्रूझ म्हणतो की, स्टंट कितीही धोकादायक असला तरी माणसाला नेहमी स्वत:वर विश्वास असायला हवा. टीमने असेही म्हटले आहे की हा स्टंट इतका धोकादायक होता की थोड्याशा चुकीमुळे टॉमला गंभीर दुखापत किंवा मृत्यू देखील ओढऊ शकतो, परंतु त्याने कधीही मागे हटले नाही. तो खूप लवकर गोष्टी शिकतो. या सीनसाठी त्याने अक्षरशः जीव ओतून काम केले.
मिशन इम्पॉसिबल 7: डेड रेकनिंग पार्ट वन' हा चित्रपट ' 14 जुलै 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा दुसरा भाग त्या पुढील वर्षी प्रदर्शित होईल. मिशन इम्पॉसिबल मालिकेतील हा शेवटचा चित्रपट असेल असे मानले जात आहे. मिशन इम्पॉसिबल मालिकेत आतापर्यंत 6 चित्रपट आले आहेत, पहिला चित्रपट 1996 मध्ये आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.