IIFA Award 2023 : 'गंगूबाई काठियावाडी'चा आयफा सोहळ्यात जलवा...संपूर्ण यादी पाहा

यंदाच्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात आलियाच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने आपली छाप सोडली आहे.
IIFA Award 2023
IIFA Award 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

IIFA Award In Abudhabi : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला आयफा पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. फिल्मफेअर नंतर आता या चित्रपटाने आयफावर आपला प्रभाव पाडला आहे. पाहुया या पुरस्कार सोहळ्याचा पूर्ण रिपोर्ट.

अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्सची जोरदार तयारी सुरू आहे. बॉलीवूड तारकांनी सजलेली संध्याकाळ आज अबुधाबी अनुभवणार आहे. आज संध्याकाळी प्रेक्षकांना नृत्य, गायन, संगीत आणि मनाला भावणाऱ्या परफॉर्मन्सची झलक पाहायला मिळेल. या वर्षी सर्व स्टार्स अवॉर्ड शोमध्ये आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क करणार आहेत यात शंका नाही. कार्यक्रमानंतर अनेक अपडेट्स समोर आले आहेत. स्टार्सच्या लूक्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी आयफाने या शोच्या तांत्रिक पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.

राजकुमार राव होस्ट

आयफाच्या तांत्रिक पुरस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फराह खान आणि राजकुमार राव यांनी केले होते. यावेळी मंचावर खूप धमाल उडाली.

 सुनिधी चौहान, बादशाह, जॅकलीन फर्नांडिस , रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही यांच्यासह अनेक स्टार्सनी टेक्निकल नाईटमध्ये सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दिला, ज्यामुळे या अवॉर्ड नाईटची मोहकता वाढली. दरम्यान, 9 श्रेणींमध्ये तांत्रिक पुरस्कारही जाहीर करण्यात आले.

9 कॅटेगिरी

एकूण नऊ श्रेणीतील तांत्रिक पुरस्कार आहेत, ज्यात सिनेमॅटोग्राफी, पटकथा, संवाद, साउंड डिझाइन, कोरिओग्राफी, एडिटिंग, स्पेशल इफेक्ट्स, बॅकग्राउंड स्कोअर आणि साउंड मिक्सिंग यांचा समावेश आहे. 

विजेत्यांच्या यादीत आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला सर्वाधिक ट्रॉफीज मिळाल्या आहेत.

तीन कॅटेगिरीत मिळाला पुरस्कार

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला तीन विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी सुदीप चॅटर्जी, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी संजय लीला भन्साळी आणि उत्कर्षिनी वशिष्ठ आणि सर्वोत्कृष्ट संवादांसाठी उत्कर्षिनी वशिष्ठ आणि प्रकाश कपाडिया. चला पाहुया  , उर्वरित विजेत्यांची यादी आणि पाहुया आणखी कुठल्या कॅटेगिरीत कुणाला किती नामांकनं मिळाली आहेत .

सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट (Scene)

DNEG, रीडिफाईन (ब्रह्मास्त्र)

सर्वोत्तम बॅकग्राऊंड स्कोअर

सॅम सीएस (विक्रम वेध)

सर्वोत्तम साऊंड मिक्सिंग

गुंजन ए साह, बोलॉय कुमार डोलाई आणि राहुल कर्पे (मोनिका ओ माय डार्लिंग)विशेष म्हणजे, 27 मे रोजी आयफा अवॉर्ड्सचा समारोप समारंभ आहे, जो अभिषेक बच्चन आणि विकी कौशल होस्ट करतील. यादरम्यान अनेक धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळतील.

IIFA Award 2023
Vivek Agnihotri On Nawaz : "मग तुझ्या चित्रपटावरही बंदी घालायची का"? विवेक अग्नीहोत्रींच्या निशाण्यावर नवाजुद्दीन...

'गंगूबाई काठियावाडी'चा असाही सन्मान झाला होता

फिल्मफेअर अवॉर्ड नाईटमध्ये संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडीने प्रसिद्धी मिळवली आणि 10 कॅटेगेरींमध्ये पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपट (गंगुबाई काठियावाडी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (संजय लीला भन्साळी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला), (आलिया भट्ट), सर्वोत्कृष्ट संवाद, (प्रकाश कपाडिया, उत्कर्षिनी वशिष्ठ), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, (संचित) यासह 16 नामांकने या चित्रपटाला मिळाली होती.

सर्वोत्कृष्ट अभिनेता (अभिनेता आणि अभिनेत्री)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीमध्ये, यामी गौतम धर (अ थर्सडे), तब्बू (भूल भुलैया 2), आलिया भट्ट (डार्लिंग्स, गंगूबाई काठियावाडी) आणि शेफाली शाह (डार्लिंग्स) यांनी त्यांच्या कामगिरीसाठी नामांकन मिळवले.

कार्तिक आर्यन (भूल भुलैया 2), अभिषेक बच्चन (10वी), अजय देवगण (दृश्यम 2), राजकुमार राव (मोनिका: ओ माय डार्लिंग), अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स) आणि हृतिक रोशन (विक्रम वेधा) यांची नावे आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीतही नामांकन मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com