Swara Bhaskar : "हिंदू -मुस्लिम भाऊ बहिण असतात ;पण नवरा बायको विनोदही करू शकतात"! स्वरा भास्करच्या नवऱ्याचे ट्विट..

स्वरा भास्करचे पती आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत
Swara Bhaskar
Swara Bhaskar Dainik Gomantak
Published on
Updated on

स्वरा भास्करचं लग्न आणि तिला केलं जाणारं ट्रोलिंग सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत लग्न झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. स्वरा भास्करने कोर्ट मॅरेजनंतरचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना चकित केले. एकीकडे स्वराला लग्नानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे तिला खूप ट्रोल केले जात आहे. 

स्वरा भास्करला तिच्या जुन्या ट्विटमुळे ट्रोल केले जात आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने फहाद अहमदला तिचा भाऊ म्हटले होते. आता फहाद अहमदने या ट्विटवरून ट्रोलर्सना चांगलच उत्तर दिलं आहे .

काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने फहाद अहमदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्रीने फहादला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिचा भाऊ म्हणून हाक मारली होती आणि अशा परिस्थितीत जेव्हा दोघांनी लग्नाची घोषणा केली तेव्हा लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. 

आता स्वराचा पती फहाद अहमदने ट्रोल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले आणि सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले. पण त्याच्या या ट्विटनंतर लोकांनी त्याला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली.

हिंदू-मुस्लिम भाऊ-बहीण असू शकतात. फक्त हे मान्य करा आणि पती-पत्नी देखील विनोद करू शकतात. एका युजरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक मौलाना असे म्हणत आहे की, "जर एखादी मुलगी मुस्लिम नसेल आणि तिने धर्मांतर न करता मुस्लिम मुलाशी लग्न केले तर असा विवाह आमच्या दृष्टीने अवैध आहे." यावर युजरने लिहिले की, 'मौलानामधील भाई तुमच्या नात्याला नवीन नाव दिले आहे.

Swara Bhaskar
Box Office : कार्तिक आर्यनच्या शहजादाचा अ‍ॅडव्हान्स बूकींग थंडावलं, तर 'पठान'ने खेळली नवी चाल...

स्वरा आणि फहाद दोघांनी आंतरधर्मीय लग्न केले मात्र दोघांचे लग्न पहिल्या दिवसापासूनच वादात सापडले आहे. फहाद अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. अशा परिस्थितीत एएमयूच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फैजुल हसन यांनी स्वरा आणि फहाद यांना लग्नानंतर विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले, त्यानंतर विद्यार्थ्यांमधील वाद वाढत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com