Box Office : कार्तिक आर्यनच्या शहजादाचा अ‍ॅडव्हान्स बूकींग थंडावलं, तर 'पठान'ने खेळली नवी चाल...

कार्तिक आर्यनचा शहजादाचं अॅडव्हान्स बुकींग थंडावलं असुन पठानच्या निर्मात्यांनी एक नवी चाल खेळली आहे
Shah Rukh Khan
Kartik Aryan
Shah Rukh Khan Kartik Aryan Dainik Gomantak

शाहरुख खानच्या पठानने गेले काही आठवडे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे, पठानच्या कमाईचा वेग अजुनही सुरूच आहे. सध्या पठानला मागे टाकणारा इतर कुठलाही चित्रपट नाही असं वाटत असताना आता कार्तिक आर्यनचा शहजादा रिलीजच्या आधीच जोरदार कमाई करत आहे.

बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याआधीच कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा'ला हिट ठरत आहे . एकीकडे चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगची अवस्था बिकट असताना यशराज फिल्म्सने शुक्रवारी 'पठाण'ची तिकिटे ११० रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. 'अँट मॅन 3' देखील 17 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, परंतु पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची स्थिती पातळ होणार असल्याचे दिसते. चित्रपटाची आगाऊ बुकिंग अत्यंत कमी असताना, शुक्रवारी याला टक्कर देण्यासाठी 'पठाण'च्या निर्मात्यांनी मोठी खेळी केली आहे. 

यशराज फिल्म्सने जाहीर केले आहे की या शुक्रवारी देशभरातील मल्टिप्लेक्स चेनमध्ये 'पठाण'ची तिकिटे रु.110 मध्ये उपलब्ध असतील. शाहरुख खानच्या चित्रपटाच्या रिलीजला शुक्रवारी 24 दिवस पूर्ण होणार आहेत, अशा परिस्थितीत 'पठाण'च्या कमाईच्या संथ गतीला शुक्रवारी वेग येण्याची शक्यता आहे. 'शहजादा'च्या बाबतीत पहिल्या दिवसाच्या एक कोटी रुपयांच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंगही बुधवारी रात्रीपर्यंत झालेले नाही.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनचा 'शेहजादा' हा अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'अला वैकुंठप्रेमुलू'चा रिमेक आहे. रोहित धवनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चे तुफान आलेले पाहून निर्मात्यांनी रिलीज आठवडाभर पुढे ढकलला. 

शहजादा हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. पण 'शेहजादा' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार रिलीज असणार नाही असे दिसते. कारण या चित्रपटाला दोन तगड्या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे. एकीकडे शाहरुख खानचा 'पठाण' आहे, जो रिलीजच्या 22 दिवसांनंतरही करोडोंची कमाई करत आहे, तर दुसरीकडे मार्वलचा सुपरहिरो चित्रपट 'अँट-मॅन अँड द वास्प क्वांटुमेनिया' शुक्रवारीच रिलीज होत आहे.

Shah Rukh Khan
Kartik Aryan
Madgaon Express : कुणाल खेमू दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण

सुरुवातीला 'शेहजादा'चे रिलीज पुढे ढकलण्यात आले तेव्हा ही एक स्मार्ट चाल मानली जात होती. पण 'अँट-मॅन 3' रिलीज होत असताना शहजादा रिलीज करणं आता आत्मघाती असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मानले जात आहे. गेल्या ११ फेब्रुवारीपासून 'शेहजादा'चे आगाऊ बुकिंग सुरू झाले होते. 

मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत केवळ सुरुवातीच्या दिवसाची ६० लाख रुपयांची तिकिटे विकली गेली हे खेदजनक आहे. हे खूप निराशाजनक आहे. कार्तिक आर्यनचा यापूर्वी रिलीज झालेला 'भूल भुलैया 2' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. रिलीजपूर्वी, 'भूल भुलैया 2' ने पहिल्या दिवसासाठी 6.55 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com