Ex Twitter India Head's Viral Tweet: ट्विट्टरच्या माजी इंडिया हेड ने सुशांत सिंह राजपूतच्या ब्लू टिक संदर्भात विचारला हा महत्त्वाचा प्रश्न..

ट्विट्टरच्या माजी इंडिया हेड ने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला दिलेल्या ब्लू टिक संदर्भात एक प्रश्न विचारला आहे,
Ex Twitter India Head's Viral Tweet
Ex Twitter India Head's Viral TweetDainik Gomantak
Published on
Updated on

Ex Twitter India Head's Viral Tweet on Sushant Singh Rajput Blue Tick: ट्विटर ब्लूचे सदस्यत्व न घेता ब्लू टिक्स का देण्यात आल्या असा सवाल करणाऱ्या सेलिब्रिटींनी अलीकडेच सर्व युजरचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या युजर्सला ब्लू टिक देण्यात आले होते त्यापैकी एक दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता.

पण दिवंगत अभिनेत्याचा फोन नंबर कसा वेरिफाय केला? हे सर्वांसाठी एक गूढ असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या आठवड्यात, जेव्हा लेखक स्टीफन किंगने विचारले की सुशांतला का ब्लू टिक का दिली गेली, तेव्हा ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी उत्तर दिले कारण 'त्याने त्यासाठी पैसे दिले'. मस्क यांना त्यांच्या ब्लू टिकसाठी पैसे देत असलेल्या इतर सेलिब्रिटींबद्दल विचारले असता,एलॉन मस्कने सांगितले “जस्ट शॅटनर, लेब्रॉन आणि किंग”.
ब्लू टिकसाठी सुशांत सिंग राजपूतच्या खात्यातुन पैसे कसे दिले जात आहेत हे अद्याप एक गूढ आहे पण मोठा प्रश्न हा आहे की त्याचा फोन नंबर कोणी वेरिफाय केला?


ट्विटर इंडियाचे माजी प्रमुख मनीष माहेश्वरी यांना सुशांतच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट सापडला ज्यामध्ये पॉपअप बॉक्समध्ये त्याचा नंबर वेरिफाय होत असल्याचे दिसून आले - “@itsSSR ने त्याचा फोन नंबर @elonmusk यांनी कसा वेरिफाय केला याबद्दल आश्चर्य वाटते? 

एकतर तुम्ही खोटे बोलत आहात किंवा लोकांनी त्यांचा फोन नंतरच्या आयुष्यात घेऊन जाण्याचा मार्ग शोधला आहे असा मिश्किल टोलाही माहेश्वरी यांनी लगावला आहे.

जून 2020 मध्ये या अभिनेत्याचा आत्महत्येने मृत्यू झाला. बहुतेक बॉलीवूड तारकांनी त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.

ट्विटरने अलीकडेच शाहरुख खान , क्रिकेटपटू विराट कोहली आणि कॉमेडियन वीर दास यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींचे ब्लूटिक पुनर्संचयित केले .

Ex Twitter India Head's Viral Tweet
Jiah Khan Suicide Case Verdict: सुरज पांचोली निर्दोष मुक्त...CBI न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, जियाची आई राबिया खान हायकोर्टात जाणार

पण सगळ्यांनाच आश्चर्य वाटले, दिवंगत अभिनेत्याचा फोन नंबरही पडताळण्यात आला, कारण महेश्वरीने सुशांतच्या प्रोफाईलवर पॉप-अप दाखवणाऱ्या ट्विटर अॅपच्या स्क्रीनशॉटद्वारे स्पष्टपणे सूचित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com