Parineeti-Raghav Engagement: परिणीती-राघवच्या साखरपुड्याची तयारी सुरू, पाहा व्हायरल व्हिडिओ

अभिनेत्री परिणीती चोप्रा आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्याशी आज म्हणजेच १३ मे रोजी साखरपुडा करणार आहे.
Parineeti Chopra | Raghav Chadha
Parineeti Chopra | Raghav ChadhaDainik Gomantak

Parineeti-Raghav Engagement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. या चर्चेला आता फुलस्टॉप लागणार आहे. कारण आज १३ मे रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा साखरपुडा करणार आहे.

बॉलिवूडपासून, राजकीय वर्तुळापर्यंत आणि चाहत्यांमध्येही त्यांच्या अफेअरची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांच्या सजलेल्या घराचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अजूनही परिणीती चोप्रा किंवा राघव चढ्ढा या दोघांनीही उघडपणे त्यांच्या नात्याला स्वीकारले नाही. परंतु, गेल्या काही काळापासून अनेकवेळा दोघांनाही एकत्र पाहण्यात आले आहे. यावरूनच दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खास नाते असल्याचे म्हटले गेले आहे.

अनेक वेळा ते दोघे डिनर डेटसाठी एकत्र दिसतात, तर कधी विमानतळावर आणि कधी आयपीएल मॅच एकत्र एन्जॉय करताना दिसतात. आता गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या जोरदार चर्चेत आहेत.

आज म्हणजेच १३ मे रोजी दोघांचा साखरपुडा असल्याचे सांगण्यात येत आहे. आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये परिणीतीच्या मुंबईतील घराबाहेरचा असल्याचे सांगण्यात आले.

या व्हिडीओमध्ये तिचे घर बाहेरून सजवलेले दिसत आहे. घराच्या बाल्कनीत दिवे लावलेले दिसत आहेत. साखरपुड्यानंतर राघव आणि परिणीती लवकरच लग्नबंधनात देखील अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले चढ्ढा हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. खासदार होण्यापूर्वी ते दिल्लीच्या राजिंदर नगरमधून आपचे आमदार होते. त्यांनी दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.  

लेडीज व्हर्सेस रिकी बहल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या परिणीतीने २०२२ मध्ये रिलीज झालेल्या केसरी, गोलमाल अगेन आणि उंचाई यासह जवळपास दोन डझन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com