Punjab 95 First Look : पंजाब 95 चा फर्स्ट लूक रिलीज, दिलजीत डोसांजला एकदा पाहाच

अभिनेता दलजीत डोसांजचा पंजाब 95 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
Punjab 95 First Look
Punjab 95 First LookDainiK Gomantak
Published on
Updated on

जसवंत सिंग खलरा यांचा बायोपिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अलीकडे जसवंत सिंग खलरा बायोपिक पंजाब 95 चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा यांची भूमिका साकारत आहे. 

चित्रपटाचा प्रिमियर

रॉनी स्क्रूवाला यांच्या प्रोडक्शन हाऊस आरएसव्हीपी मूव्हीजने सोमवार, २४ जुलै रोजी रात्री या लुकचे अनावरण केले. यादरम्यान, 2023 मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होणार असल्याचेही सांगण्यात आले.

दिलजीत डोसांज लिहितो

आपल्या सोशल मीडिया हँडलवर फर्स्ट लूक शेअर करताना दिलजीत दोसांझने लिहिले, 'वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह! टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर. मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा जी यांच्या जीवनावर आधारित पंजाब 95 चा फर्स्ट लुक सादर करत आहे.

हनी त्रेहान

कास्टिंग डायरेक्टर हनी त्रेहान द्वारे दिग्दर्शित, पंजाब 95 मध्ये अर्जुन रामपाल आणि सुविंदर विकी देखील प्रमुख भूमिकेत आहेत, ज्यांचे अलीकडे कोहरा या वेब सिरीजमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव घल्लूघरा होते, तेव्हापासून हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 

सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट द्यायला वेळ लावला

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक वेळ घेतला आणि ए प्रमाणपत्रासह 21 कट करण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी CBFC विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Punjab 95 First Look
Javed Akhtar - Kangna : कंगनाने वाढवला जावेद अख्तर यांच्या डोक्याचा ताप, 2020 च्या प्रकरणाबाबत कोर्टात हजर राहण्याचे आदेश

जसवंत सिंह खलरा यांचं योगदान

जसवंत सिंग खलरा हे मानवाधिकार कार्यकर्ते होते ज्यांनी हजारो अज्ञात लोकांचे अपहरण, हत्या आणि अंत्यसंस्कार केल्याचा पुरावा शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1980 च्या दशकाच्या मध्यापासून ते 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंतच्या बंडखोरीच्या काळात पंजाबमध्ये 25,000 बेकायदेशीर अंत्यसंस्कारांची खलरा यांच्या चौकशीने जगभरात निषेध व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com