Javed Akhtar - Kangna : कंगनाने वाढवला जावेद अख्तर यांच्या डोक्याचा ताप, 2020 च्या प्रकरणाबाबत कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अभिनेत्री कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्या वादाचं रुपांतर आता न्यायालयीन लढाईत झालं आहे.
Javed Akhtar - Kangna
Javed Akhtar - KangnaDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेत्री कंगना रणौत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यात कायदेशीर लढाई सुरूच आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार , मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाच्या तक्रारीवर जावेद अख्तर यांना भारतीय दंड संहिता कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ५०९ (महिलेच्या विनयशीलतेचा अपमान) अंतर्गत समन्स बजावले आहे. जावेद अख्तर यांना 5 ऑगस्ट रोजी अंधेरी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कंगना आणि रंगोली यांच्यातला वाद

24 जुलैल कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांचे डॉक्टर रमेश अग्रवाल हे 10 व्या दंडाधिकारी न्यायालयासमोर साक्षीदार होते. त्यांनी 2016 मध्ये जावेद आणि कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्यात झालेल्या भेटीबद्दल बोलले. कंगना आणि हृतिक रोशन यांच्यातील वादाबद्दल जावेद त्यांच्याशी बोलले होते अशी माहिती त्याने कोर्टाला दिली.

हृतीकसोबतचा कंगनाचा वाद

2016 मध्ये जावेदने कंगनाला हृतिक रोशनसोबतच्या तिच्या सार्वजनिक वादावर तिला काही सल्ला देण्यासाठी जावेद अख्तर यांनी घरी बोलावले होते. 2020 मध्ये, कंगनाने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने तिला या विषयावर बोलल्याबद्दल धमकी दिली होती आणि नंतर तिच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला होता. त्यानंतर तिने जावेद अख्तर यांच्याविरोधात तिने तक्रारही दाखल केली.

Javed Akhtar - Kangna
Archana Puran Singh: स्त्री कमी पुरुष जास्त वाटतेस ! युजरच्या या विकृत कमेंटवर अभिनेत्री म्हणाली...

कुठलाही वाईट शब्द बोलले नाहीत

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी डॉक्टरांना बैठकीत कथित बदनामीकारक शब्द बोलल्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी ते ऐकले नाही असे सांगितले. डॉ अग्रवाल म्हणाले, "मीटिंग सुमारे 20-30 मिनिटे चालली आणि निघण्यापूर्वी जावेदने तिला सांगितले, 'तुम्हाला माफी मागावी लागेल. यावेळी जावेद अख्तर यांनी कुठलाही कठोर शब्द वापरला नाही असं डॉ अग्रवाल यांनी सांगितले.

Javed Akhtar - Kangna
Archana Puran Singh: स्त्री कमी पुरुष जास्त वाटतेस ! युजरच्या या विकृत कमेंटवर अभिनेत्री म्हणाली...

जावेद अख्तर यांना सांगितले होते का?

कंगनाच्या वकिलानंतर, रिजवान सिद्दीकी यांनी विचारले कंगनाने जावेदला तिच्या आणि हृतिकमधील वादात मध्यस्थी करण्यास सांगितले होते का, डॉ अग्रवाल यांनी यावर नकार दिला. जावेद अख्तर यांच्या विनंतीवरून मी तिथे आल्याचे त्यांनी मान्य केले. 

मीटिंगचा अजेंडा आणि हृतिक आणि त्याचे कुटुंब त्यात सहभागी नसल्याबद्दल विचारले असता डॉ अग्रवाल म्हणाले की, दोघांनी एकमेकांची माफी मागावी असा अजेंडा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com