Shraddha Walker हत्याकांडावर बनणार चित्रपट, या दिग्दर्शकाने सुरु केले काम

Delhi Murder Case Movie: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.
Shraddha Walker
Shraddha WalkerDainik Gomantak
Published on
Updated on

Who Killed Shraddha Walker: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे करुन मेहरौलीच्या जंगलासह विविध ठिकाणी फेकून दिले. पोलीस अजूनही श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान, बॉलिवूडने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, चित्रपट दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी हृदयद्रावक हत्याकांडावर काम सुरु केले आहे.

या नावाने चित्रपट बनवला जाणार

इंडिया हेराल्डच्या वृत्तानुसार, निर्माते-दिग्दर्शक मनीष एफ सिंग दिल्ली (Delhi) हत्याकांडावर चित्रपट बनवणार आहेत. चित्रपटाचे वर्किंग नाव - 'Who Killed Shraddha Walker' ठेवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट श्रद्धा वालकरच्या हत्येवर आधारित असेल. या चित्रपटाच्या (Movie) पटकथेवरही काम सुरु झाले आहे. मात्र, जोपर्यंत पोलिस आरोपपत्र दाखल करत नाहीत तोपर्यंत पटकथा निश्चित होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Shraddha Walker
Shraddha Murder Case: 'मोदी सरकारमुळे श्रद्धासारखे प्रकरण घडले...', AIUDF च्या MLA चे वादग्रस्त वक्तव्य

लव्ह जिहाद हा चित्रपटाचा मुद्दा असेल!

मनीष एफ सिंग यांनी त्यांच्या चित्रपटाबाबत स्पष्ट केले की, 'हा चित्रपट लव्ह जिहादवर असेल. मुलींची फसवणूक करुन जगासमोर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांचे कारस्थान हा चित्रपट उघड करेल. वृंदावन फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनणार असून, त्यात कोणते कलाकार असतील, हे अद्याप ठरलेले नाही.'

Shraddha Walker
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नवी अपडेट, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

तसेच, श्रद्धा वालकर मर्डर केस चित्रपटाला लोक लव्ह जिहादचे नावही देत ​​आहेत. तथापि, हे सांगणे खूप घाईचे ठरेल कारण जोपर्यंत पोलिसांचा (Police) तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांना त्यांच्या निर्णयावर अंकुश ठेवावा लागेल. पोलिस या प्रकरणाचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com