Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नवी अपडेट, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

जंगलात मिळालेले अवयव वडिलांच्या डीएनएशी जुळलेले नाहीत
Shradhha Walkar Case
Shradhha Walkar CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Shraddha Walkar Murder Case: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी रोज नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. देशाची राजधानी- दिल्ली देखील या क्रूर घटनेने हादरून गेलीय. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याप्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Shradhha Walkar Case
Rahul Gandhi Viral Video : राहुल गांधींच्या 'Bharat Jodo' यात्रेत राष्ट्रगीताच्या नावावर वाजले दुसरेच काही, पाहा व्हिडिओ

आफताब अमीन पूनावाला याला गुरुवारी दिल्लीतील साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होण्याच्या अर्जाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे त्याला व्हीसीमार्फत न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

Shradhha Walkar Case
Uttarakhand Government Decision: सक्तीने धर्मांतर केल्यास 'इतकी' वर्षे तुरूंगवास

आफताबने केलेल्या कृत्यानंतर दिल्ली पोलिसांनी अथक प्रयत्नांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार, श्रद्धाचा मोबाईल फोन आणि गुन्हा करताना आरोपींने परिधान केलेले कपडे इ. दिल्ली पोलिसांना अद्याप मिळवता आले नाहीत. पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक देखील सज्ज केले आहे. परंतु मृत श्रद्धाच्या शरीराचे अवयव, विशेषत: तिचे डोके अद्याप सापडलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे मेहरौली जंगलातून श्रद्धाच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले असले तरी अद्याप तिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळलेले नाहीत. दरम्यान, आफताब वेळोवेळी पोलिसांची दिशाभूल करत असून, तो त्याची विधाने वारंवार बदलत आहे. असे तपासकर्त्या पोलिसांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com