बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला मंगळवारी हार्ट अरिथमियच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. दीपिका हैदराबादमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'प्रोजेक्ट के' या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होती. शूटिंगदरम्यान दीपिकाला ह्रदयाचे ठोके वाढल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले होते, तिला तातडीने कामिनेनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या मते, दीपिकाच्या घाबरण्याचे कारण हृदयाशी संबंधित विकार आहे.
हृदय गती वाढणे हृदयविकीराचे लक्षण असु शकते. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अलीकडेच बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (KK) यांचेही हृदयविकाराने निधन झाले आहे. हृदय गती वाढणे याला वैद्यकीय भाषेत हार्ट अरिथमिया म्हणतात. त्यामुळे दीपिकाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. चला जाणून घेऊया हार्ट एरिथमिया म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याची कारणे काय आहेत.
हार्ट एरिथमिया म्हणजे काय?
हृदयाची गती अनियमित होणे म्हणजे हार्ट एरिथमिया होय. हार्ट ऍरिथमिया हा हृदयाचा एक विकार आहे. ज्यामध्ये हृदयाचे ठोके असामान्य आणि अनियमित होतात. ही समस्या सतत उद्भवल्याने धोकादायक ठरू शकते.
हृदय अतालता लक्षणं
जलद हृदयाचा ठोका
हृदय गती कमी
अनियमित हृदयाचे ठोके
मान किंवा छातीत धडधड होणे
हृदयाचे ठोके कमी
अशक्तपणा
थकवा
रक्तदाब कमी होणे
जेव्हा हृदय मेंदूला पुरेसे रक्त पुरवठा करत नाही
अशक्तपणा किंवा चक्कर येणे
श्वास घेण्यात अडचण किंवा दम लागणे
छातीत दुखणे
ओटीपोटात सूज येणे
मद्यपान आणि कॉफीचे अतासेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होउन हार्ट अरिथमिया होउ शकतो.
* हार्ट एरिथमियाचा धोका
ही हृदयाशी संबंधित समस्या आहे. ऍरिथमियाच्या या समस्येचे निदान करण्यासाठी, ऍरिथमिया चाचणी आवश्यक आहे. एरिथमिया चाचण्यांचे अनेक प्रकार आहेत, ज्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जाऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.