शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट देशाबरोबरच परदेशातही कमाईचे नवे विक्रम करत आहे. देशभरात सहा दिवसांत हिंदी वर्जनमधुन २९४.५० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या अॅक्शन फिल्मने जगभरात ५९१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
हा चित्रपट सहा दिवसांत जगभरात 600 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण पहिला सोमवार हा कामकाजाचा दिवस असल्याने थिएटरमधील कमाईचा वेग थोडा कमी झाला आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, रिलीजच्या सहाव्या दिवशी, चित्रपटाने हिंदी आवृत्तीतून देशात 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर परदेशी बाजारपेठेत चित्रपटाने सोमवारी 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
देशात डब व्हर्जन म्हणजेच तमिळ आणि तेलुगूमध्ये या चित्रपटाने सोमवारी १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
यशराज फिल्म्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 'पठाण' ने 6 दिवसात केवळ विदेशी बाजारातून $27.56 दशलक्ष म्हणजेच 224.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात, चित्रपटाने सहा दिवसांत तमिळ आणि तेलुगू वर्जनमधुन 10.75 कोटी रुपये कमवले आहेत. म्हणजेच हिंदी, तमिळ आणि तेलगूसह देशातील निव्वळ कलेक्शन 305.25 कोटी रुपये आहे. तर एकूण संकलन 366.40 कोटी रुपये आहे.
'पठाण'च्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट आमिर खानच्या 'दंगल'चा विक्रम मोडून जगभरात कमाईत नंबर 1ची खुर्ची मिळवू शकेल का? आमिर खानचा 'दंगल' हा सध्या जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे.
'दंगल'ने जगभरात 2023.81 कोटी रुपयांची कमाई केली.पठाणची सध्याची कमाई बघता तो दंगलचा रेकॉर्ड मोडेल हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.