Kailash Kher Attacked: कन्नड गाणे न गायल्याने गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला

कर्नाटकात हम्पी महोत्सवातील प्रकार; संशयित आरोपींना अटक
Kailash Kher Attacked
Kailash Kher AttackedDainik Gomantak
Published on
Updated on

Kailash Kher Attacked: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकात भर कॉन्सर्टदरम्यान खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. हा हल्ला करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. कन्नड गाणे न म्हटल्याने चिडून एका प्रेक्षकाने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

Kailash Kher Attacked
UGC New Guidelines: आता विद्यापीठातील विद्यार्थीच बनणार शिक्षक; 5 निरक्षरांना शिकवणे सक्तीचे...

कर्नाटकातील हम्पी शहरात कैलाश खेर यांची मैफल होती. या मैफिलीत प्रचंड गर्दी जमली होती आणि त्याचवेळी प्रेक्षकांतून बाटली फेकली गेली. त्यामुळे खेर यांनी तिथेच कार्यक्रम थांबवला.

कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हम्पीतील या कार्यक्रमाची माहिती दिली होती. रविवारी कैलाश खेर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कैलास बँडचा शिवनाद हा कार्यक्रम हंपी महोत्सवात आयोजित केला होता.

Kailash Kher Attacked
Ramcharitmanas Row: रामचरितमानस दहन प्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा

कैलाश खेर यांच्या कॉन्सर्टने हम्पी महोत्सवाची सांगता होणार होती. पण या प्रकाराने या कार्यक्रमाला गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी खेर यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. गर्दीतून त्यांना विविध गाण्यांची शिफारसही केली जात होती.

एका प्रेक्षकाने खेर यांनी कन्नड गाणे न गायल्याने त्यांच्यावर कॉन्सर्टदरम्यान बाटली फेकली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. मात्र, गायकाच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com