Dadasaheb Phalke: "तो कॅमेरा सगळी शक्ती शोषुन घेतो आणि आपण मरतो" ! दादासाहेब फाळकेंना विचित्र अफवांचा त्रास झाला

भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांना चित्रपट बनवताना खूप त्रास झाला
Dadasaheb Phalke
Dadasaheb Phalke Dainik Gomantak
Published on
Updated on

आज भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव जगभरात सन्मानाने घेतलं जातं. जगात सर्वात जास्त चित्रपट हे भारतात बनतात पण हा प्रवास असाच सुरू नाही झाला. त्यासाठी एका अवलिया कलाकाराला प्रसंगी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवायला लागले.

आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ या व्यक्तीने चित्रपट बनवण्यासाठी घालवला. आणि ही व्यक्ती म्हणजे भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके. १६ फेब्रुवारी हा त्या महान व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीचा दिवस , ते नसते तर भारतीय चित्रपटसृष्टी जन्माला आली नसती. त्यांनीच या चंदेरी सोनेरी दुनियेचा पाया रचला आणि लोकांना चित्रपट म्हणजे काय हे सांगितले. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुवातीला दादासाहेब फाळके यांनाही चित्रपट असे काही असते हे माहितही नव्हतं . त्याला फोटोग्राफर व्हायचे होते. याच मनस्वी इच्छेने दादासाहेब फाळके यांनी १८९० मध्ये तैल आणि जल रंग चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी फिल्म कॅमेरा विकत घेतला आणि फोटोग्राफीचे प्रयोग सुरू केले.

दादासाहेब फाळके यांची फोटोग्राफीची आवड होती ज्यामुळे त्यांना फोटो-लिथिओपासून ते थ्री-कलर ब्लॉकमेकिंग, कलरटाइप आणि थ्री-कलर सिरॅमिक फोटोग्राफीपर्यंत सर्व काही शिकायला मिळाले.

 पण या फोटोग्राफीचा व्यवसाय लवकच डबघाईला आला. कॅमेऱ्याबद्दल प्रचंड गैरसमज आणि त्याची भिती लोकांनी विनाकारण  दादासाहेब फाळके यांचा कॅमेरा दिसला की घाबरून फोटो काढण्यास नकार देत असे. 

दादासाहेब फाळके यांनी कला भवनातून तैल आणि जलरंग चित्रकलेचा अभ्यासक्रम घेतल्यानंतर तेथील प्राचार्य गज्जर यांच्या मार्गदर्शनाखाली छायाचित्रणाच्या उर्वरित पद्धती व तंत्रे शिकून घेतली. दादासाहेब फाळके यांची प्रतिभा पाहून गज्जर यांनी त्यांना कला भवनची लॅब आणि फोटो स्टुडिओ मोफत वापरायला दिला. येथे त्यांनी 'श्री फाळके' या नावाने फोटो प्रिंटिंग आणि खोदकाम सुरू केले.

 दादासाहेब फाळके हे अत्यंत हुशार होते, फोटोग्राफीपासून ते छपाई आणि वास्तूकलेपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होते, तरीही त्यांच्याकडे उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन नव्हते. दादासाहेब फाळके यांना जगणे आणि पोट भरणे कठीण जात होते.

Dadasaheb Phalke
Uttarakhand Government Decision: सक्तीने धर्मांतर केल्यास 'इतकी' वर्षे तुरूंगवास

अशा परिस्थितीत दादासाहेब फाळके यांनी फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर गोध्रा येथे राहायला गेले. येथे एका कुटुंबाने त्यांना स्टुडिओवर काम करण्यासाठी मोकळी जागा दिली. पण दादासाहेबांचे काम नीट होण्याआधीच त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. दुखी दादासाहेब फाळके नंतर ते ठिकाण सोडून बडोद्याला गेले आणि तेथे त्यांनी आपले कार्य स्थापन करण्याचे ठरवले. 

हे सगळं सुरू असताना एक अफवा पसरली की दादासाहेब फाळकेचा कॅमेरा माणसाच्या शरीरातील सर्व ऊर्जा शोषून घेतो आणि मग तो माणूस मरतो. त्यामुळे सर्वजण दादासाहेबांच्या जवळही यायला तयार नसायचे . दादासाहेबांचा कॅमेरा दिसला की लोक पळून जायचे. या गोष्टीमुळे दादासाहेबांचे फोटोग्राफीचे काम बंद पडले आणि त्यांना उदरनिर्वाह करण्यात अडचण येऊ लागली. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष जारी ठेवला आणि मग घडला इतिहास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com