Uttarakhand Government Decision: सक्तीने धर्मांतर केल्यास 'इतकी' वर्षे तुरूंगवास

उत्तराखंडच्या मंत्रीमंडळाचा निर्णय: आता अजामिनपात्र गुन्हा दाखल होणार
CM Pushkar Singh Dhami
CM Pushkar Singh Dhami Dainik Gomantak

Uttarakhand Government Decision: उत्तराखंडच्या मंत्रीमंडळ बैठकीत धर्मांतर कायद्यात काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार जबरदस्तीने धर्मांतर हा आता अजामिनपात्र गुन्हा असले. तसेच या अंतर्गत 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली जाईल. सक्तीने धर्मांतर आणि लव्ह जिहाद यावर राज्यात बंदी असणार आहे.

CM Pushkar Singh Dhami
Highway On LAC: चीनच्या सीमेला खेटून भारत बांधणार 2000 किलोमीटरचा फ्रंटियर हायवे

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत एकुण 26 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. उत्तराखंड हायकोर्ट नैनितालहून हल्द्वानी येथे स्थनांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2018 मध्ये राज्य सरकारने फ्रीडम ऑफ रिलीजन अॅक्ट मंजूर केला होता. यात फसवून किंवा सक्तीने धर्मांतर केल्यास तो गुन्हा अजामिनपात्र ठरवला जाईल आणि 5 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा अशी तरतूद होती. धामी गतवर्षी म्हणाले होते की त्यांनी पोलिसांना जबरदस्तीने धर्म परिवतर्न आणि लव्ह जिहाद याविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यावेळीच त्यांनी सक्तीने करण्यात येत असलेल्या धर्मांतराविरोधातील कायदा आणखी कडक करणार असल्याचे सांगितले होते.

CM Pushkar Singh Dhami
Google Play UPI Autopay: Online पेमेंट करणे आणखी होईल सोपे, गुगल-पे ने लॉंच केले 'हे' नवे फिचर

दोन दिवसांपुर्वीच सुप्रीम कोर्टाने जबरदस्तीने धर्मांतर किंवा लालूच दाखवून केलेले धर्मांतर हा गंभीर प्रकार असल्याचे म्हटले होते. केवळ धार्मिक स्वातंत्र्यासाठीच नाही तर देशाचा सुरक्षिततेसाठीही ते धोकादायक असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना म्हटले होते की, धर्मांतराच्या घटना बहुतांश करून आदिवासी भागात जास्त होतात. त्यावर कोर्टाने सरकार काय करत आहे? अशा घटना रोखाव्यात. धर्मांतर हे कायदेशीर आहे, पण सक्तीने धर्मांतर हे बेकायदा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com