Suerstar Rajnikant : खबरदार ! रजनीकांतचा आवाज किंवा फोटो वापराल तर...होईल कायदेशीर कारवाई...

थलैवा अर्थात रजनीकांत यांचा आवाज किंवा नाव वापरणाऱ्याच्या विरोधात आता कायदेशीर कारवाई होणार आहे
Superstar Rajnikanth
Superstar Rajnikanth Dainik Gomantak
Published on
Updated on

Suerstar Rajnikant साऊथ आणि बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये आपली छाप पाडणारा सुपरस्टार रजनीकांत सध्या खूपच चर्चेत आहे. तसे थलैवा नेहमीच चर्चेत असणारं नाव आहे ;पण यावेळी ते चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्यावतीने नोटीस बजावण्यात आली असून, त्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. काळजी करू नका, हे प्रत्येकासाठी नाही तर त्या ब्रँडसाठी आहे जे थलैवाचा फोटो आणि आवाज वापरतात.

सुपरस्टार रजनीकांत यांना परिचयाची गरज नाही. ते त्यांच्या वेगळ्या स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखले जातात. ते अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत आरोग्याच्या अनेक समस्या असूनही चित्रपट आणि राजकारणात सक्रिय असण्याचा त्यांचा उत्साह खरंच वाखाखण्याजोगा आहे. 

असंख्य चाहते त्यांच्या सभ्य वागण्याचे आणि स्टाईलचे वेडे आहेत. याच कारणामुळे त्यांचा आवाज आणि स्टाईल कित्येकदा जाहिरातीत वापरली जाते. पण आता या गोष्टी आता करता येणार नाहीत त्याचं कारण म्हणजे आता थलैवाने नोटीस बजावल्यामुळे प्रत्येकासाठी हे करणे केवळ अवघडच नाही तर अशक्य होणार आहे.

ही कायदेशीर नोटीस असल्यामुळे कुणी या गोष्टीचं उल्लंघन केलं तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

रजनीकांत हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'थलैवा' या नावाने प्रसिद्ध आहेत. साऊथचे त्यांचे चाहते त्यांच्यावर एवढं प्रेम करतात की, लोक त्यांची पूजा करतात. त्यांचा चित्रपट एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. तिथले लोक मोठ्या थाटामाटात अभिनेत्याची पूजा करतात. दूध अर्पण करतात. पदार्थ भोग म्हणून दिले जातात.

त्यांचे फॅन्स त्यांच्या चालण्याच्या आणि बोलण्याच्या स्टाईलचंही अनुकरण करतात. इतकंच नाही तर काही जण त्याच्या नावाचा, आवाजाचा आणि AI जनरेट केलेल्या इमेजचा गैरवापर करतात,

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांतच्या वकिलाने त्यांची स्वाक्षरी केलेले एक पत्र जारी केले आहे ज्यात त्यांच्या संमतीशिवाय सुपरस्टारची ओळख स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्यांना ताकीद दिली आहे. अभिनेत्याची ओळख, प्रसिद्धी आणि सेलिब्रिटी अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. रजनीकांत यांची ओळख, नाव, आवाज, प्रतिमा आणि इतर वापरावर नियंत्रण असल्याचेही म्हटले आहे. थोडक्यात रजनीकांत यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना रॉयल्टी दिल्याशिवाय त्यांची कुठलीही स्टाईल कॉपी करता येणार नाही.

Superstar Rajnikanth
Siddharth And Kiara: सिद्धार्थ आणि कियारा लवकरच रेशीमगाठ बांधणार? इन्स्टाग्रामवर काय म्हणाला सिद्धार्थ..

केवळ रजनीकांत यांचा आवाज, नाव किंवा प्रतिमा वापरण्यास मनाई नाही तर त्यांची कॉपी करणे देखील उल्लंघन मानले जाईल. असं या नोटीशीत म्हटले आहे.

थलैवाच्या प्रतिष्ठेचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा वापर केल्यास त्याचे उल्लंघन समजण्यात येईल आणि त्यामुळे त्याच्या क्लायंटचे मोठे नुकसान होईल, ज्यामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होईल. ओळखीचा भंग करणाऱ्यावर रजनीकांत कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com