Siddharth Malhotra
 Kiara Advani
Siddharth Malhotra Kiara Advani Dainik Gomantak

Siddharth And Kiara: सिद्धार्थ आणि कियारा लवकरच रेशीमगाठ बांधणार? इन्स्टाग्रामवर काय म्हणाला सिद्धार्थ..

अभिनेतो सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारी अडवाणी लवकरच लग्नाची घोषणा करण्याची शक्यता आहे
Published on

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidhdharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी(Kiara Adawani) हे बॉलिवूडमधील सर्वात जोडप्यांपैकी एक आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने एकत्र एक चित्रपटही केला आहे आणि दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

या जोडप्याने त्यांच्या बाजूने काहीही सांगितलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स आणि बातम्यांवर विश्वास ठेवला तर ते दोघे 6 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न करणार आहेत. 

प्रसारमाध्यमांशी स्वतंत्रपणे संवाद साधताना, त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले जात असताना, दोघेही लाजून हे प्रकरण टाळत आहेत; ते नाकारत नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

सिद्धार्थच्या ही नवी घोषणा काय असणार आहे? याविषयी चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे कारण त्यांना वाटत आहे की उद्या सिद्धार्थ कियारासोबत त्याच्या लग्नाची घोषणा करणार आहे... 

Siddharth Malhotra
 Kiara Advani
Pathan Box Office Collection: शाहरुखने बॉलिवूडच्या भितीचं सावट दूर केलं आहे?

सिद्धार्थ मल्होत्रा ​​इंस्टाग्रामवर सतत अॅक्टिव्ह असतो आणि वेळोवेळी नवीन पोस्ट पोस्ट करत असतो. काही वेळापूर्वी, सिद्धार्थने एक नवीन इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली ज्यामध्ये सिद्धार्थने फक्त लिहिले की तो उद्या एक 'बोल्ड' घोषणा करणार आहे. सिद्धार्थची ही घोषणा काय असेल याचा अंदाज प्रत्येकजण घेत आहे.

साहजिकच ही घोषणा सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासंबंधी असणार आहे अशीच शक्यता चाहते व्यक्त करत आहेत. गेले कित्येक दिवस सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिलेशनवर सोशल मिडीयावर गॉसिप्स सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com