Mahira Khan : 'रणबीर कपूर'सोबतच्या त्या व्हायरल फोटोनंतर अभिनेत्री माहिरा खान डिप्रेशनमध्ये गेली होती...

शाहरुख खानच्या रईस चित्रपटात शाहरुखच्या पत्नीची भूमीका साकारणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने तिच्या डिप्रेशनच्या काळातल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे.
Mahira Khan
Mahira KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistani Actress Mahira Khan on her Depression : 'अम्मीजान कहती है कोई भी धंदा छोटा नही होता' शाहरुख खानचा हा डायलॉग आठवतोय? बरोबर काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'रईस' या चित्रपटातला हा डायलॉग किंग खान शाहरुखचा आहे.

रईस चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री माहिरा खाननेही काम केले होते. सध्या माहिराचा उल्लेख होण्याचे कारण म्हणजे तिने नुकतीच दिलेली मुलाखत.

माहिरा खानने रईसच्या रिलीजच्या वेळी तिला आलेल्या धमकी आणि प्रतिक्रियांमुळे तिच्या आत दडलेली चिंता आणि नैराश्य कसे बाहेर आले याबद्दल खुलासा केला. माहिरा नेमकं काय म्हणाली चला पाहुया

माहिराचा मानसिक संघर्ष

माहिरा खानने तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षाबद्दल आणि सायकॅट्रिकने मॅनिक डिप्रेशनचे निदान केल्याचं या मुलाखतीत सांगितलं. माहिराने FWhy Podcast ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षांच्या काळात कशी लढली.

विशेषत: शाहरुख खान - स्टारर रईस मधुन बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आणि 2017 साली अभिनेता रणबीर कपूरसोबत तिचे धूम्रपान करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतरचा अनुभवही माहिराने सांगितला.

उरीचा हल्ला

माहिराने 2016 च्या उरी हल्ल्याबद्दलही सांगितले, ज्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली होती . 

माहिरा म्हणाली, "मी चित्रपट (रईस) पूर्ण केला होता आणि सर्व काही ठीक चालले होते आणि मग अचानक हा उरी हल्ल्याची घटना घडली.

मला धमक्या यायच्या

मला भीती वाटली नाही, पण मला धमकावले गेले. सतत ट्विट, खरं तर, मला कॉल यायचे आणि ते खूप भीतीदायक असायचे. मला फक्त एकच गोष्ट हवी होती की 'ठीक आहे, मी रईसचं प्रमोशन करण्यासाठी भारतात जाऊ शकत नाही , पण मला आशा होती की तो माझ्या देशात प्रदर्शित होणार कारण मला माहित आहे की लोक रईस पाहण्यासाठी गर्दी करतील कारण शाहरुख खानला पाकिस्तानमध्ये खूपच पसंत केलं जातं."

माहिराचा नैराश्याचा अनुभव

2017 मध्ये रईस रिलीज झाला, त्याच वर्षी रणबीर कपूरसोबत स्मोकिंग पिक्चर्स स्कँडल घडलं. त्या वेळेचा अनुभव सांगताना माहिरा म्हणाली 'हे 'अनपेक्षित होते पण मला खूप प्रतिक्रियांचा सामना केला.

माहिरा म्हणाली, "त्या प्रतिक्रियांमुळे माझ्या आत दडलेली चिंता आणि नैराश्य बाहेर आले. हा माझ्यासाठी हा एक कठीण काळ होता. मला अटॅक झाल्यासारखे वाटले. सतत प्रतिक्रिया… तुम्हाला भारतीय चॅनेलवर क्षुल्लक ट्विट, टिप्पण्या मिळत होत्या.

माझा विश्वास तुटला

मुलाखतीत माहिरा म्हणाली "एक वेळ असा होता की माझा विश्वास तुटला आणि माझ्या मनात तीव्र चिंता निर्माण झाली की एके दिवशी मला पॅनीकचा झटका आला आणि मी बेशुद्ध झाले.

मी पहिल्यांदाच थेरपीसाठी गेले होते. पण मी अनेक थेरपिस्टकडे गेले होते म्हणून त्याचा परिणाम झाला नाही. ते वर्ष खडतर होते... मला झोप येत नव्हती, माझे हात थरथरत होते.

Mahira Khan
Dream Girl 2: ड्रीम गर्ल पूजाला रक्षाबंधनाच्या दिवशी मिळाली 7 कोटींची ओवाळणी...बॉक्स ऑफिस कलेक्शन

क्लिनिकल डिप्रेशन

माहिरा पुढे म्हणाली की ती गेल्या 6-7 वर्षांपासून अँटीडिप्रेसंट घेत आहे. ती म्हणाली की तिने औषधं मध्येच सोडण्याचा प्रयत्न केला पण त्याचा त्रास तिला झाला '. माहिराने असेही सांगितले की, ती इतकी वर्षे औषधोपचार घेत असल्याबद्दल ती पहिल्यांदाच उघडपणे बोलत आहे.

ती म्हणाली की ती 'हॉस्पिटलमध्ये आणि बाहेर मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे'. माहिराने असेही सांगितले की प्रत्येकामध्ये चढ-उतार असतात, 'वाईट काळ आणि आनंदाचा काळ असतो, परंतु क्लिनिकल डिप्रेशन हे इतर कोणत्याही मानसिक आजार किंवा शारीरिक आजारांसारखे असते'.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com