Aryan Khan Debut Series: किंग खानचा राजपुत्र आर्यन दिग्दर्शक म्हणुन झळकणार या वेब सिरीजमधुन..कसं असेल पदार्पण?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या वेब सिरीजमधुन पदार्पण करत आहे.
Aryan Khan Debut
Aryan Khan DebutDainik Gomantak
Published on
Updated on

Aryan Khan Debut Series: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान चर्चेत आला तोच मुळात नकारात्मक कारणांनी आर्यन खानला पोलिसांकडुन ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आणि त्याची सुरूवातच अतिशय वाईट चर्चेने झाली.

ड्रग्ज प्रकरणातुन आर्यन खान पूर्णपणे निर्दोष सुटला असुन त्याने मध्यंतरी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये आपण आता स्क्रिप्ट लिहण्यात बिझी असल्याचंही सांगितलं होतं.

सध्या आर्यन खान चर्चेत आहे कारण लवकरच तो दिग्दर्शक म्हणुन या वेबसिरीजमधुन पदार्पण करणार आहे.

SRK चे आणि आर्यनचे अनेक चाहते देखील या बातमीने आश्चर्यचकित आणि उत्साहित झाले आहेत. हा प्रोजेक्ट रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे तयार केला जाणार आहे.

त्यावेळी एका लेखक बिलाल सिद्दीकी यांनी आर्यनच्या पोस्टवर कमेंट केली होती आणि "सीरीज अभी बाकी है मेरे दोस्त" असे म्हटले होते. त्यामुळे आर्यन चित्रपटातून नव्हे तर वेब सीरिजमधून दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार या वेब-सिरीजचे सहा भाग असतील आणि त्याचे नाव 'स्टारडम' आहे. ही सिरीज फिल्म इंडस्ट्रीचीच गोष्ट सांगणार आहे आणि म्हणूनच हे टायटल अर्थपूर्ण आहे.

आर्यनने बिलालसोबत या मालिकेचे लेखन केले आहे. खरं तर, तो शो रनर देखील आहे आणि त्यावरील अधिक माहिती लवकरच बाहेर येईल.

Aryan Khan Debut
Three Idiots 2 : आमिर खानची 3 इडियट्स 2 ची तयारी, करीना कपूरला कल्पनाही नाही?

दरम्यान, आर्यनने त्याच्या स्वत:च्या ब्रँडसाठी दिग्दर्शक म्हणून त्याची पहिली जाहिरात केली आणि त्यात त्याचे वडील SRK देखील होते. एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आर्यनने वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. 

तो म्हणाला की शाहरुखसोबत काम करणे आव्हानात्मक नाही कारण तो त्याच्या अनुभव आणि डेडिकेशनमुळे सेटवर प्रत्येकाचे काम सोपे करतो. प्रत्येकाचा आदर करून तो क्रूलाही आरामशीर वाटतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com