Three Idiots 2 : आमिर खानची 3 इडियट्स 2 ची तयारी, करीना कपूरला कल्पनाही नाही?

अभिनेता आमिर खान सध्या इंडस्ट्रीपासून काही काळ लांब असला तरी सध्या 3 इडियट्स 2 येणार असल्याच्या चर्चा आहेत
Aamir Khan 
Kareena Kapoor
Aamir Khan Kareena KapoorDainik Gomantak

Three Idiots Sequel: काही काळापूर्वी 3 इडियट्स या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होती, आता ती पुन्हा सुरू झाली आहे.

तुम्ही बरोबर ऐकले. '3 इडियट्स'चा सिक्वेल येणार आहे. होय, खुद्द करीना कपूरने ही आनंदाची बातमी दिली आहे. 

करीना कपूरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवनने तिच्यापासून सर्वकाही लपवल्याचे सांगितले. आता तिला हे गुपित कळले आहे. 

ती लगेच फोन उचलते आणि बोमन इराणीला या रिपोर्ट्सबद्दल विचारते. आता करीना कपूरचा हा व्हिडिओ पाहून चाहते उत्साहित झाले आणि आनंदाने उड्या मारल्या.

सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले की अचानक अभिनेत्रीने '3 इडियट्स'बद्दल इतके मोठे अपडेट कसे दिले.

या चित्रपटाचा सिक्वल येणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती पण काही काळाने याला ब्रेक लागला होता पण आता पुन्हा या चर्चेला उधाण आलं आहे.

करीना कपूर खानने '3 इडियट्स' संदर्भात शेअर केलेला व्हिडिओ. ही नुसती चर्चा आहे की वास्तव हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण तिने फक्त '3 इडियट्स'चा उल्लेख केला आहे. ती याबाबतीत तक्रार करताना दिसत आहे. 

आमिर, शर्मन आणि आर माधवन चित्रपटाविषयी पत्रकार परिषद घेत असताना तिने एक व्हायरल क्लिप देखील पाहिली. करीना म्हणाली की हे तिघे नक्कीच काहीतरी लपवत आहेत. त्यानंतर तिने बोमन इराणी यांना याबाबत फोन केला.

काही दिवसांपूर्वी राजकुमार हिरानी यांनी मीडियाशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला होता की, तो 3 इडियट्सचा सिक्वेल बनवणार आहे. फ्रँचायझीबाबत ते म्हणाले होते की, लेखनाचे काम सुरू आहे. 

ते त्यांचे सहलेखक अभिजात जोशी यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र, त्याच्या सीक्वलमध्ये कोणते कलाकार असतील, कथानक काय असेल आणि तो कधी फ्लोरवर येईल याबाबत दिग्दर्शकाने माहिती दिली नाही.

Aamir Khan 
Kareena Kapoor
Akshay Kumar Accident : बॉलिवूडचा खिलाडी जखमी...शूटींग करताना अक्षय कुमारचा स्कॉटलंडमध्ये अपघात...

करीना कपूर आमिर खानसोबत '3 इडियट्स'मध्ये दिसली होती. 2009 मध्ये आलेला राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

अवघ्या 55 कोटी इतके बजेट असलेल्या या प्रकल्पातून 400 कोटींची कमाई केली. 

या चित्रपटात आमिर खान रँचो, आर माधवन-फरहान, शरमन जोशी-राजू रस्तोगी, करीना-पिया आणि बोमन इराणी व्हायरसच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या कथेपासून प्रत्येक पात्र लोकप्रिय झाले.

3 इडियट्स जोडी आमिर खान आणि करीना कपूर यांनी 2009 नंतर गेल्या वर्षी पुन्हा एकदा एकत्र काम केले. दोघांचा लालसिंग चढ्ढा हा चित्रपट आला होता. 

हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नसला तरी या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com