Arjun Kapoor: 'मरते दम तक'निर्मात्याबद्दल हे काय म्हणाला अर्जुन कपूर?

अभिनेता अर्जुन कपूरने 'मरते दम तक'च्या निर्मात्यांबद्दल अर्जुनने आपलं मत मांडलं आहे
Arajun Kapoor
Arajun Kapoor Dainik Gomantak
Published on
Updated on

अमेझॉन प्राइम व्हिडिओने अलीकडेच आपली 'सिनेमा मरते दम तक'ही सिरीज रिलीज केली असून, या सिरीजने भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळातील चित्रपटांची स्पष्ट आणि खरी झलक दाखवून इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

अशातच, ही अमेझॉन ओरिजनल सिरीज 90 च्या दशकातील पल्प सिनेमात कोणी आणि काय योगदान दिलं हेही सांगते . तसेच, या 6 भागांच्या डॉक्यू-सिरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरला गेस्ट होस्ट म्हणून पाहायला मिळत असून, त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिलीप गुलाटी, जे नीलम, किशन शाह, आणि विनोद तलवार यांचा प्रभाव त्याच्यावर पडतो असंही दाखवलं गेलं आहे

अर्जुन कपूर म्हणाला "या सिरीजमध्ये मी कॅमिओ किंवा एक एक स्पेशल अपीयरेंसची व्यक्तिरेखा साकारली आहे. हे चित्रपट निर्माते मोकळेपणाने बोलू शकतील असे व्यासपीठ बनून मला मूल्य वाढवायचे होते. एक क्षण जो त्यांना सेलिब्रेट करत होता अशा क्षणाचा एक भाग झाल्याचा मला आनंद झाला. प्राइम व्हिडीओने त्यांना एक व्यासपीठ दिले ज्याची थट्टा करण्याचा हेतू नव्हता.

ज्यांनी काही वेगळा कंटेंट दिला, त्या लोकांना हायलाइट करत आहेत ज्यांनी हा प्रवास केला आहे. जिथे ते त्यांच्या कथेची बाजू उत्तम सांगू शकले अशा माहोलचा एक भाग बनून मला खूप आनंद झाला .

Arajun Kapoor
Kailash Kher Attacked: कन्नड गाणे न गायल्याने गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला

'सिनेमा मरते दम तक' आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर भारत आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम होत आहे. तसेच, व्हाइस स्टुडिओ प्रोडक्शनची हि डॉक्यू-सिरीज वासन बाला यांनी तयार केली असून, याचे सह-दिग्दर्शन दिशा रिंदानी, झुल्फी आणि कुलिश कांत ठाकूर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com