Pan Masala जाहिरातीतून माघार घेण्याचे अमिताभ बच्चन यांना आवाहन

पान मसाल्या जाहिरात जेव्हा अमिताभ बच्चन सारखे चित्रपटसृष्टीतील महान व्यक्ती करतात त्यावेळी जनमानसांत वेगळाच संदेश पोहचतो.
Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisement
Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisementDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील प्रसिध्द डॉक्टर व नॅशनल ऑर्गनायजेशन फॉर टोबेको इरॅडीकेशन (National Organization for Tobacco Eradication) (NOTE) या सस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना पत्र पाठवून पान मसाल्याच्या जाहिरातीतून माघार घेण्याचे आवाहन केले आहे.

Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisement
Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisementDainik Gomantak

डॉ. साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पान मसाल्या जाहिरात जेव्हा अमिताभ बच्चन सारखे चित्रपटसृष्टीतील महान व्यक्ती करतात त्यावेळी जनमानसांत वेगळाच संदेश पोहचतो. देशात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे तसेच धुम्रपानमुळे लाखो लोक दरवर्षी मरतात. अशा पार्श्‍वभुमीवर तंबांखूजन्य पदार्थावर नियंत्रण गरजेचे आहे. नोट ही संस्था देशातील लोकांनी तंबाखूचे सेवन करु नये, तंबाखू चघळणे, खाणे, सिगरेट ओढणे यावर नियंत्रणच नव्हे तर बंदी यावी यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे.

Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisement
Goa: ‘आप’ सत्तेवर येणारच नाही; दामोदर नाईक

अशा स्थितीत देशातील तांबाखूमुळे होणारे बळी थांबवण्यासाठी बच्चन सारख्या सिलीब्रेटीनी प्रयत्न करण्याची , जनजागृती करण्याची गरज आहे. मात्र त्यांच्यासारखे स्टार तंबाखूचा समावेश असलेल्या पान मसालाची जाहिरात करु लागल्याने लोकांना सदर वस्तूचे आकर्षन वाढते. त्यामुळे नोट मार्फत अमिताभ बच्चन यांना पत्र पाठवून पान मसाल्याच्या जाहिरातीतून माघार घ्या. व तंबाखू व पान मसाला विरोधी मोहिमेत सहभागी होऊन युवकांसह लोकांचे प्राण वाचवण्यास मदत करा. असी सुचना केल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.

Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisement
Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisementDainik Gomantak
Appeal to Amitabh Bachchan to withdraw from Pan Masala advertisement
Goa Election: 20 मिनिटांची भेट आणि उत्पल पर्रीकर रिंगणात

यापूर्वी बच्चन यांनी केलेल्या सिगार ( सिगारेट) जाहिरातीच्या विरोधात साळकर यांनी 2006 मध्ये बच्चन यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यावर बच्चन यांनी जाहीर माफीही मागितली होती आणि जाहिरात ही माघारी घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com