Anupam Kher On Lal Singh Chaddha: "लाल सिंह चढ्ढा हा चांगला चित्रपट नव्हता, तुम्ही सत्य स्वीकारायला हवं" बॉयकॉट ट्रेंडवर अनुपम खेर बोललेच..

अभिनेते अनुपम खेर यांनी 'लाल सिंह चढ्ढा'च्या बॉयकॉट ट्रेंडवर अखेर मत मांडलं आहे.
Anupam Kher On Lal Singh Chaddha
Anupam Kher On Lal Singh ChaddhaDainik Gomantak
Published on
Updated on

Anupam Kher On Lal Singh Chaddha: आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा', जो गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या वेळी पडद्यावर आला होता, त्याला बॉक्स ऑफिसवर खूपच संघर्ष करावा लागला होता.

रिलीज होण्यापूर्वी, चित्रपटाला बॉयकॉटच्या आव्हांनाला सामोरे जावे लागले आणि शेवटी 59 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला.

या चित्रपटावरच्या बहिष्कारामुळे आमिरचा चित्रपट कोसळला हे खरे आहे,कित्येक कलाकारांनी यावर आपले मतदेखील मांडले आहे. आता यावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या एका संवादात अनुपम खेर यांनी ' बॉयकॉट बॉलिवूड' या सोशल मीडिया ट्रेंडबद्दल आणि याचा आमिर खानच्या चित्रपटावर झालेल्या परिणामाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

अनुपम खेर यांनी एएनआयला सांगितले की, “लाल सिंग चड्डा हा एक चांगला चित्रपट नव्हता. या मुलाखतीत त्यांनी आपली प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे मांडली आहे. अनुपम खेर वादग्रस्त मुद्द्यावक थेट भूमीका घेतात हे यापुर्वीही त्यांनी दाखवून दिले आहे.

जर तो एक उत्तम चित्रपट असता तर कोणत्याही शक्तीने तो रोखला नसता. आमिर खानचा 'पीके' खूप छान चालला. मुद्दा असा आहे की तुम्हाला सत्य स्वीकारण्याची गरज आहे. मी बहिष्काराच्या ट्रेंडसाठी नाही, अजिबात नाही पण तुम्ही एखाद्याला जे करायचे आहे ते करण्यापासून रोखू शकत नाही. 

तुमचं प्रोडक्शन चांगलं असेल, तर त्याला त्याचा प्रेक्षक सापडतो. आणि ही प्रवृत्ती नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्कृष्ट काम करणे. थोडक्यात अनुपम खेर यांना हा चित्रपट आवडला नव्हता आणि म्हणुनच तो चालला नाही.

Anupam Kher On Lal Singh Chaddha
Aryan Khan Debut Series: किंग खानचा राजपुत्र आर्यन दिग्दर्शक म्हणुन झळकणार या वेब सिरीजमधुन..कसं असेल पदार्पण?

'बॉलिवुडवर बहिष्कार टाका' या ट्रेंडबद्दल पुढे बोलताना अनुपम खेर पुढे म्हणाले, “मला वैयक्तिकरित्या वाटते की या ट्रेंडचा चित्रपटावर परिणाम होणार नाही.

तुमचा चित्रपट चांगला असेल तर चालेल पण तुमचा चित्रपट वाईट असेल तर त्याचा परिणाम होईल पण ट्रेंडमुळे नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

 एखाद्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला किंवा चित्रपटातील व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार असेल, तर त्याने/तिनेही त्या परिस्थितीतून जाण्यासाठी पुरेसे धाडसी असले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com