Amitabh Bachhan : जेव्हा अमिताभ बच्चन अनोळखी व्यक्तीच्या बाईकवरुन शूटींगला पोहोचतात... अन् इन्स्टावर आभार मानतात...

बिग बी अमिताभ बच्चन यांची इन्स्टाग्रामची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या निडरपणा आणि नम्रतेने चाहत्यांना प्रभावित करतात. सुपरस्टारने अलीकडेच कामाच्या ठिकाणी त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी बाईकवरून जाताना एक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन दिले, "राइडसाठी धन्यवाद मित्रा.. तुला ओळखत नाही.. पण तू लिफ्ट दिलीस आणि मला कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं .. जलद आणि न सोडवता येणारी ट्रॅफिक जाम टाळता येण्यासाठी .. कॅप घातलेला , शॉर्ट्स आणि पिवळा टी शर्ट घालणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद "

बिग बी यांनी फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच त्यांची नात नव्या नंदा कमेंट सेक्शनमध्ये आली आणि तिने लाफिंग आणि रेड हार्टचा इमोजी टाकला.

ज बच्चन त्यांच्या चाहत्यांशी मोकळेपणाने संवाद साधत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात. राहतात. त्यांनी अलीकडेच कळवले की त्यांच्या रविवारच्या रोजच्या रुटिनचा असणारी चाहत्यांशी भेटण्याची त्यांची परंपरा आता थोडी कठीण आहे" .

बिग बी यांनी नुकतेच त्यांच्या ब्लॉगवर लिहिले की, "गेट बाय द संडे अनिश्चित वाटला होता, परंतु माझे दिग्दर्शक उदार होते आणि त्यांनी अशा पद्धतीने काम पूर्ण केले ज्यामुळे मला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी वेळेत परत जाणे शक्य झाले. माझ्या शुभचिंतकांना समर्पित."

Amitabh Bachchan
Top 5 Inspirational Bollywood Movies: 'या' मुव्हीज तुम्हाला देतील ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा...

दरम्यान, वर्क फ्रंटवर, अमिताभ बच्चन पुढील 'प्रोजेक्ट के' मध्ये दिसणार आहेत, जो नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपट आहे आणि त्यात दीपिका पदुकोण आणि प्रभास आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रित केला जाणार आहे. तसेच बीग बी रिभू दासगुप्ताच्या आगामी कोर्टरूम ड्रामा चित्रपट 'सेक्शन 84' मध्ये काम करणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com