'83 वर्षे वय, पण स्वॅग तोच'! कल्की 2 चे शूटिंग सुरु; महानायक अमिताभ बच्चननी शेअर केला कमल हसनसोबत खास Photo

Amitabh Bachchan Kalki 2: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या हैदराबादमध्ये त्यांच्या बहुचर्चित ‘कल्कि 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.
Amitabh Bachchan Kalki 2 | Amitabh Bachchan Kamal Haasan
Amitabh Bachchan Kalki 2 | Amitabh Bachchan Kamal HaasanDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या हैदराबादमध्ये त्यांच्या बहुचर्चित ‘कल्कि 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. रविवारी त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील बिहाइंड द सीन (BTS) छायाचित्रे शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली. जवळपास चार दशकांनंतर कमल हासन यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.

अमिताभ आणि कमल हासन यांची जोडी शेवटची 1985 साली प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ चित्रपटात एकत्र दिसली होती. त्यानंतर दोघेही आपल्या स्वतंत्र कारकिर्दीत व्यस्त राहिले. विशेष म्हणजे ‘कल्कि 2898 AD’ या पहिल्या भागात दोघांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या; मात्र एकाही दृश्यात ते एकत्र दिसले नव्हते. त्यामुळे ‘कल्कि 2’ मध्ये त्यांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ते ‘अश्वत्थामा’ या भूमिकेतील लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रोस्थेटिक मेकअप असून, व्यक्तिरेखेची गंभीरता आणि भव्यता स्पष्ट जाणवते. या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत चाहत्यांना विशेष भावत आहे.

Amitabh Bachchan Kalki 2 | Amitabh Bachchan Kamal Haasan
Amitabh Bachchan: जन्मापूर्वीच झालेली भविष्यवाणी! हरिवंशराय बच्चन का म्हणायचे 'अमिताभ'ला वडिलांचा पुनर्जन्म?

कमल हासन यांच्यासोबतचे एक छायाचित्रही त्यांनी पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना आलिंगन देताना आणि मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतात. “महान कमल हासन यांची भेट… अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम… शेवटचे ‘गिरफ्तार’मध्ये सोबत होतो,” असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले आहे.

Amitabh Bachchan Kalki 2 | Amitabh Bachchan Kamal Haasan
Amitabh Bachchan: वेडा नाटकवाला, शास्त्रीय गायक! 'अमिताभ बच्चन' यांचे हे सिनेमे तुम्ही बघितले नसणार..

दरम्यान, ‘कल्कि 2898 AD’ हा चित्रपट 27 जून 2024 रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत विक्रम प्रस्थापित केला. अलीकडेच फिल्मफेअर अवॉर्ड्स साउथ (तेलुगू) 2026 मध्ये या चित्रपटाने दोन पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांनी जिंकला, तर उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचा सन्मान नितिन जियानी चौधरी यांना मिळाला. त्यामुळे ‘कल्कि 2’बाबतची अपेक्षा आणखी उंचावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com