Al- Pacino : अखेर 82 वर्षांच्या या अभिनेत्याने 29 वर्षांच्या गर्लफ्रेंडपासुन वेगळं होण्याचा निर्णय घेतलाच...
गॉडफादर, डेविल्स अॅडव्होकेट, स्कारफेस यांसारख्या चित्रपटातून जगभरातल्या प्रेक्षकांना अभिनयाच्या अनेक शेड्स दाखवणारा एक अवलिया अभिनेता म्हणजे अल-पसिनो.
वयाच्या 82 व्या वर्षी स्वत:पेक्षा 54 वर्षांनी लहान असणाऱ्या गर्लफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी अलपचिनो यांच्या गर्लफ्रेंडने एका मुलाला जन्मही दिला आहे.
सध्या अलपचिनो गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह हिच्याशी झालेल्या वादामुळे वेगळे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नूर अलफल्लाह आणि अलपचिनो
: गेल्या काही काळापूर्वी सोशल मिडीयावर चर गॉडफादर फेम अभिनेता अल पचिनो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलपचिनो यांनी 54 नी लहान असणाऱ्या नूर अलफल्लाह पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आपल्या मुलाच्या ताब्यात देण्याची मागणीही केली आहे. नूर आणि अल पचिनोची प्रेमकहाणी कधी आणि कशी सुरू झाली चला त्यावर एक नजर टाकूया.
गर्लफ्रेंडपासून वेगळं होण्याचा निर्णय
हॉलिवूड अभिनेता अल पचिनो वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा वडील झाल्यामुळे चर्चेत होता. अल पचिनोची 29 वर्षीय मैत्रीण नूर अलफल्लाहने नुकतेच एका मुलाला जन्म दिला होता. पण त्यानंतर काही दिवसांनी हे नातेही वादात सापडले.
आता मिळालेल्या माहितीनुसार अल पचिनो आणि नूर अलफल्लाह यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्कर विजेत्या हॉलिवूड अभिनेता अलपचिनो यांनी नूरपासून घटस्फोटाचा निर्णय घेतला असून मुलाचा ताबा देण्याचीही मागणी केली आहे.
गरोदरपणीची माहिती लपवली
गॉडफादर फेम अल पचिनो आणि नूर यांच्या मुलाचे नाव रोमन पचिनो होते. याआधी पचिनो त्यांच्या गर्लफ्रेंडवर रागावल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, नूरने अलपचिनोपासून गरोदरपणाची बातमी लपवली होती. अशा स्थितीत अलपचिनो यांना या गोष्टीचा राग आला आणि त्याने डीएनए चाचणीची मागणी केली होती .
आता अल पचिनोने त्याच्या 54 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी अल आणि नूर यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यामध्ये नूर अलफल्लाहने मुलाच्या ताब्याची मागणी केली आहे. मात्र, या वृत्तांवर दोघांचेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही.
नूरची कोर्टात धाव
नूर आणि अल पचिनो या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय का घेतला, याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र नूरने मुलाचा ताबा देण्याची मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे. तिने सांगितले आहे की ती मुलाला अल पचिनोला भेटू देईल.
मुलाशी संबंधित प्रत्येक निर्णयात तो आपले मतही देऊ शकतो पण यावर अलपचिनो यांना मुलाचा ताबा हवा असुन गर्लफ्रेंडच्यासोबत मात्र राहायचे नाही .
अलपचिनोचे चौथे अपत्य
अल पचिनोचे हे चौथे अपत्य आहे. याआधी त्याला एक मोठी मुलगी आहे, तिचे नाव ज्युली मेरी आहे. ती 33 वर्षांची आहे. याशिवाय अलपचिनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही दोन जुळी मुले आहेत.
पेज सिक्सच्या रिपोर्टनुसार पचिनो आणि नूरचे नाते फार जुने नाही. दोघांची भेट कोविड 19 दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. एप्रिल 2022 मध्ये व्हेनिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते.