अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिका दिसणार या चित्रपटात...जाणून घ्या रिलीज डेट

अभिनेता अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिका यांचा हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
Ajay Devagn Upcoming Movie
Ajay Devagn Upcoming MovieDainik Gomantak
Published on
Updated on

Ajay Devagn - Madhavan Movie : अजय देवगन आणि आर माधवनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. अभिनेता आर माधवन, साऊथची सुंदर अभिनेत्री ज्योतिका आणि अजय देवगन आता एका चित्रपटात दिसणार आहेत.

या चित्रपटाचं नाव अद्याप सांगण्यात आलं नसलं तरी रिलीज डेट मात्र घोषित करण्यात आली आहे.चला पाहुया या मल्टिस्टारर चित्रपटाचे अपडेट्स

अजय देवगण ,आर माधवन आणि ज्योतिका हे पॉवरहाऊस त्रिकूट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये तुम्हाला एक अॅक्शन थ्रिलर एंटरटेनमेंट देण्यासाठी सज्ज झाला आहे. 

विकास बहल दिग्दर्शित, टायटल नसलेला एज-ऑफ-द-सीट सुपरनॅचरल थ्रिलर 8 मार्च 2024 रोजी त्याचे थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

2024 मध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटातून 'जानकी बोडीवाला' या तरुण अभिनेत्रीचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे.

Jio Studios, Ajay Devgn films आणि Panorama Studios International द्वारे प्रस्तुत, अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार आहेत. 

हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अजय देवगणने त्याच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाची घोषणा केली आणि लिहिले, “गोष्टी एक अलौकिक वळण घेणार आहेत. 

विकास बहल दिग्दर्शित, या थ्रिलरमध्ये , आर माधवन आणि ज्योतिका या माझ्या त्रिकुटाच साक्षीदार व्हा . 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये येत आहे!” अजयने चित्रपटाची घोषणा केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी त्यांचा उत्साह व्यक्त केला आणि कमेंट सेक्शनमध्ये हार्ट-आय इमोजी टाकले. खालील पोस्ट पहा!

अजय देवगन - आर माधवन

अजय देवगण आणि आर माधवन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या वर्षी जूनमध्ये पिंकव्हिलाने विशेष वृत्त दिले होते की अजय देवगणच्या कुमार मंगतसोबतच्या सुपरनॅचरल थ्रिलरचे नाव ब्लॅक मॅजिक आहे. 

पिंकविलाच्या वृत्तानुसार Jio Cinema ने अजय देवगणच्या 3 चित्रपटांचे पोस्ट-थिएटरीयल स्ट्रीमिंग अधिकार मिळवले आहेत - ब्लॅक मॅजिक, रेड 2 आणि दृष्यम 3. ब्लॅक मॅजिक जूनमध्ये फ्लोरवर गेला. 

Ajay Devagn Upcoming Movie
शरद मल्होत्रासोबतचं ब्रेकअप, मुल दत्तक घेण्याचा निर्णय...'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांकाच्या आयुष्यातले ते चढ-उतार

रेड 2 चं स्क्रिप्टिंग सुरू

या चित्रपटाशी संबंधित एका स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार असलेल्या एका, "ब्लॅक मॅजिक हा गुजराती चित्रपट एक अलौकिक थ्रिलर आहे, ज्याचे 40 दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणी चित्रीकरण केले जाईल, तर रेड 2 सध्या स्क्रिप्टिंग टप्प्यात आहे.

राजकुमार गुप्ता रेडचे दिग्दर्शन असतील. ब्लॅक मॅजिक हा चित्रपट या नाट्यमय थ्रिलरने प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन देण्यासाठी 2024 च्या उन्हाळ्यात रिलीज होईल.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com