Daughter's Day
Daughter's DayDainik Gomantak

Daughter's Day निमित्त अल्लू अर्जूनने शेअर केला लेकीचा खास व्हिडीओ

अभिनेते अल्लू अर्जुनने लेकीचा एक खास व्हिडीओ डॉटर्स डे निमित्त शेअर केला आहे.
Published on

"पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझा क्या?... फ्लॉवर नही फायर है मै" हा डायलॉग कोण विसरेल? पुष्पा : द रायझिंग या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अल्लू अर्जुन सध्या एका व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे.

आज 'डॉटर्स डे' निमित्त अल्लू अर्जुनने आपल्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या मुलीशी तमिळ भाषेत काहीतरी बोलताना दिसत आहे.

अल्लू अर्जुनने साजरा केला डॉटर्स डे

24 सप्टेंबरचा दिवस सर्वत्र कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जो जगभरातील बापांच्या लाडक्या मुलींना समर्पित केला जातो. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुनने आपल्या मुलीसोबतचा एक क्यूट व्हिडिओ बनवला शेअर केला आहे.

 व्हिडीओमध्ये तो आपल्या मुलीला खाऊ घालताना आणि बेडवर पडून तेलुगुमध्ये काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. यावर मुलगी आरा जोरात हसते.

अल्लू अर्जुनने दिल्या शुभेच्छा

व्हिडिओ शेअर करून अल्लू अर्जुनने सर्वांना डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, 'ज्याने या जगाला सुंदर जागा बनवली त्या सर्व मुलींना कन्या दिनाच्या शुभेच्छा.' 

अल्लू अर्जुनच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत आणि ते वडील-मुलीच्या बंधाचे कौतुक करत आहेत.

Daughter's Day
Katrina Kaif Pregnancy : कॅटरिना खरंच प्रेग्नंट आहे ? चाहत्यांना का पडलाय प्रश्न...

अरहा

अल्लू अर्जुनप्रमाणेच 6 वर्षांची अरहा देखील स्टार आहे. ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

 नुकतेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चिमुकल्या अर्हाने स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती साकारली होती. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com