Katrina Kaif Pregnancy : कॅटरिना खरंच प्रेग्नंट आहे ? चाहत्यांना का पडलाय प्रश्न...
अभिनेत्री कॅटरीना कैफ अलीकडे लाईमलाईटमध्ये पूर्वीसारखे नसते. विकी कौशलशी झालेल्या लग्नानंतर कॅटरीना फारशी ग्लॅमरमध्ये नसते. आता कॅटरीना एका अफवेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. चला पाहुया ही अफवा आहे की सत्य.
गरोदरपणाच्या चर्चा
9 डिसेंबर 2021 रोजी बॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न झाले.
कॅटरीनाच्या गरोदरपणाच्या चर्चा तिचं लग्न झाल्यापासून होत्या. याला दोन्ही स्टार्सनी कधीही दुजोरा दिला नसला तरी, दोघांनीही 'गुड न्यूज'बाबत कुटुंबाकडून कोणताही दबाव नसल्याचे सांगितले.
विकी एकटाच का दिसतोय?
आता गेल्या काही दिवसांपासून विकी सर्वत्र एकटाच दिसत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले आहे. अंबानींची गणपतीपूजा असो वा अन्य कोणताही कार्यक्रम. अखेर त्याची पत्नी विकीसोबत का दिसत नाही? ती गर्भवती आहे का? आता याचे कारण समोर आले आहे.
कटरिना गर्दीपासून
कतरिना कैफ गेल्या अनेक दिवसांपासून फिल्मी पार्टी, शोज आणि लोकांच्या नजरेपासून दूर आहे. दुसरीकडे, विकी कौशलही जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला एकटाच जात आहे.
साहजिकच दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. किंवा कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का?, म्हणूनच ती घराबाहेर पडत नाहीये असाही अंदाज चाहत्यांनी बांधायला सुरूवात केली आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कतरिना कैफ तिच्या कामात व्यस्त आहे. ती गर्भवती नाही. सूत्रांनी तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
कॅटरीना तिच्या कामात व्यस्त
खरं तर, अभिनेत्री खूप व्यस्त आहे, त्यामुळे कामानिमित्त ती अनेक शहरांमध्ये फिरत आहे. ती विकी कौशलसोबत गणपती उत्सवात का येत नाही, याविषयी सूत्राने सांगितले की, कतरिना मुंबईत नाही.
कटरिना आगामी टायगर 3 मध्ये
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ 'टायगर 3' या स्पाय-ड्रामामध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे.
याशिवाय तो फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. ती विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस'मध्येही दिसणार आहे.
विकी कौशलबद्दल सांगायचे तर तो 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये दिसला होता. आता त्याचा 'साम बहादूर' प्रदर्शित होणार आहे.