

पणजी: ‘येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) विरोधी पक्षांसोबत युती करण्यास तयार आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीनेही स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यासाठी मंजुरी दिली आहे’, असे ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले.
दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल बोलत होते. ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी मार्लेना, आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूज सिल्वा, राज्य निमंत्रक वाल्मिकी नाईक, प्रशांत नाईक आदी यावेळी उपस्थित होते.
‘येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी गोव्यात विरोधी पक्षांची युती होणे गरजेचे आहे. ‘आप’ही गोव्यात विरोधी पक्षांसोबत युती करण्यास तयार आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीने गोव्यातील पदाधिकाऱ्यांना त्यासाठी मंजुरीही दिलेली आहे.
त्यामुळे पुढील काळात विविध पक्षांशी युतीबाबत चर्चा सुरू होईल’, असे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टची स्थापना स्वतः पंतप्रधानांनी केली असून, त्यातील प्रत्येक सदस्याची निवडही त्यांनी स्वतः केली आहे. अशा परिस्थितीत या सर्व प्रकाराची त्यांना माहिती नव्हती, यावर विश्वास ठेवणे शक्य आहे का? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.
अरविंद केजरीवाल यांनी घेतले मारुतीरायाचे दर्शन!
अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सायंकाळी आतिषी आणि स्थानिक नेत्यांसह पणजीतील मारुती मंदिरात मारुतीरायाचे दर्शन घेतले. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी आणि दान चोरीला पाठिंबा देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.