Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

Goa Sahara Authority: गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विविध कारणांवरून होणारे तंटे सोडवण्यासाठी सरकारकडून लवकरच ‘सहारा’ नावाने प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे.
Goa Sahara Authority
Goa Housing SocietyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विविध कारणांवरून होणारे तंटे सोडवण्यासाठी सरकारकडून लवकरच ‘सहारा’ नावाने प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांतील भांडणे, वाद सोडवण्यासाठी संबंधितांना सहकार खात्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे (रिकन्सिलिएटर) किंवा सहाय्यक निबंधकांकडे जाण्याची वेळ येणार नाही.

‘‘सहकार खात्याकडे राज्यात हजारो गृहनिर्माण सोसायट्यांची नोंदणी आहे. या सोसायट्यांत नेहमीच विविध कारणांमुळे वाद, तंटे होत असतात. त्याबाबतच्या तक्रारी ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि सोसायट्यांतील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी सरकारने रिकन्सिलिएटरची नियुक्ती केली आहे. सोबतच असे वाद सहाय्यक निबंधकांकडेही येत असतात. परंतु, रिकन्सिलिएटर आणि साहाय्यक निबंधक आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने अशा तंट्यांवर लवकर तोडगा निघत नाही.

Goa Sahara Authority
'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

‘त्यांचे’ तंटे लवकर निघणार निकाली

‘‘गृहनिर्माण सोसायट्यांत फ्लॅट असलेले अनेकजण गोव्याबाहेर राहतात. अधूनमधून ते आपल्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी येतात. त्यावेळी त्यांचे इतरांशी तंटे झाल्यानंतर ते रिकन्सिलिएटर किंवा सहाय्यक निबंधकांकडे धाव घेतात आणि त्यानंतर पुन्हा गोव्याबाहेर जातात. त्यामुळे त्यांचे तंटे अधिक काळ प्रलंबित राहतात. आता ‘सहारा’मुळे असे तंटे लवकर निकाली लागण्यास मदत होईल,’’ असे आपटे म्हणाले.

देशातील पहिलेच प्राधिकरण ठरणार!

‘‘गृहनिर्माण सोसायट्यांत राहणाऱ्या नागरिकांमधील तंटे सोडवण्यासाठी इतर कोणत्याही राज्याने आतापर्यंत स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केलेली नाही. प्रथमच गोव्याने अशाप्रकारचे प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात गोव्याच्या पावलावर पाऊल ठेवून इतर राज्येही अशा प्राधिकरणांची स्थापना करतील,’’ असा विश्वास आशुतोष आपटे यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com