Adnan Sami: "तुला मला दफन करायचं नाही" वजन कमी केल्या च्या प्रश्नावर अदनानने सांगितलं वडिलांचं ते वाक्य...

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याने चमत्कारीकरित्या आपले वजन कमी कसे केले?
Adnan Sami
Adnan Sami Dainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या दर्दभऱ्या गाण्यांमुळे लोकांना वेड लावणारा गायक अदनान सामी एकेकाळी प्रचंड लठ्ठ होता इतका कि त्या वजनाचा नंतर त्याला प्रचंड त्रास होऊ लागला होता. नंतरच्या काळात त्याने या गोष्टीचा गांभिर्याने विचार केला आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले.

अचानक जेव्हा अदनान समोर आला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. काही लोकांनी अदनान सामीने वजन कमी करण्यासाठी सर्जरी केल्याची शक्यता व्यक्त केली.

130 किलो वजन कमी करणे हे काही सोपे नव्हते,यासाठी खुप मेहनत आणि संयमाची गरज असते. अदनान सामीचा वजन कमी करण्याचा हा प्रवास आता अदनानने स्वत: शेअर केला आहे. अदनान सामी आपला हा अनुभव सांगताना म्हणाला "डॉक्टरने मला सांगितलं की ज्या पद्धतीने तू तुझं आयुष्य जगतोयस त्यावरुन तु काही दिवसांनी तुझ्या आई-वडिलांना कुठल्यातरी हॉटेलच्या रूममध्ये मेलेला दिसशील, आणि या गोष्टीचं मला आश्चर्य नाही वाटणार.

डॉक्टरांचं हे बोलणं माझे वडिल ऐकत होते. त्या दिवशीच्या संध्याकाळी माझे वडिल माझ्याशी बोलले. ते म्हणाले आतापर्यंत मी ते सगळं सहन केलं आहे जे तुला भोगायला लागत आहे,तुझ्या सगळ्या सुख-दुखात मी तुझ्या सोबत आहे.मी आतापर्यंत तुझी साथ दिली आहे आणि तुझ्याकडे काही मागितलंही नाही. माझी तुला एक रिक्वेस्ट आहे , तु मला दफन करायचं आहेस मी तुला दफन नाही करणार. कुठल्याच वडिलांना त्याच्या मुलाला दफन करायला लागु नये".

Adnan Sami
Nana Patekar Birthday : त्या दिवशी नाना नसते तर अशोक सराफ यांचं बरं वाईट झालं असतं...

अदनानने सांगितलं की त्यानंतर त्याने अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या वडिलांना वचन दिलं की तो वजन कमी करण्यावर काम करेल.वजन कमी करण्यासाठी अदनान टेक्सासला गेला आणि तिथं त्याने न्यूट्रिशनिस्ट शोधुन काढली.

अदनान सांगतो की त्या न्यूट्रिशनिस्टने माझं पुर्ण आयुष्य बदललं. आजही अदनान त्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलेली लाईफस्टाईल फॉलो करतो. वजन कमी केल्यानंतर समोर आलेला अदनान बघुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अदनानचा हा प्रवास आज कित्येकांनी प्रेरणादायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com