आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एक वेगळ्या शैलीचा अभिनेता म्हणुन नाना पाटेकर यांनी एक ओळख निर्माण केली आहे. क्रांतीवीर, यशवंत, अग्नी साक्षी, अपहरण, महापुरूष, शागिर्द, अब तक छप्पन, परिंदा यांसारख्या चित्रपटांतून नानांनी आपण किती ताकदीचे आहोत हे दाखवुन दिलं आहे.
नाटकापासुन सुरूवात करुन हिंदी चित्रपटांत स्वत:चे एक पर्व निर्माण करणारा अभिनेता म्हणुन नानांची ओळख आहे. आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने अभिनेते अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्या मैत्रीचा सांगितलेला हा किस्सा. अशोक सराफ यांनी तर नाना नसता तर मी त्या दिवशी राहिलो नसतो असं सांगितलं आहे. काय होता हा किस्सा चला जाणुन घेऊया.
अशोक सराफ यांचा मराठी इंडस्ट्रीतला तो ऐन उमेदीचा काळ होता. तेव्हा अशोक सराफ एक नाटक करत होते, सिनेमातल्या या सुपरस्टारला नाटकातही बघायला लोक उत्सुक होते. आतापर्यंत एक सुपरस्टार म्हणुन अशोक सराफ ओळखले जाऊ लागले होते. त्यामुळे मराठी नाटकांमधुन त्यांना पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी होती.
नाटकाच्या एका अशाच प्रयोगात अशोक सराफ यांच्यावर हा जीवघेणा प्रसंग उद्भवला होता. अशोक सराफ यांना पाहायला थिएटरला प्रचंड गर्दी जमली होती, तो शो हाऊसफुल होता. आणि अचानक काही कारणामुळे हा प्रयोग रद्द करावा लागला. साहजिकच प्रेक्षकांना या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी अशोक सराफ यांना शोधायला सुरूवात केली, त्यांच्यावर हल्ला करुन त्यांच्यावर राग काढायचं असंच ठरवुन जणु प्रेक्षक आले होते.
पुढे काय घडणार याची कल्पना नाना पाटेकर यांना आल्याने त्यांनी अशोक सराफ यांना थिएटरच्या मागच्या बाजुने बाहेर काढले, लोकांच्या रोषाला सामोरे गेलो तर काय अनिष्ट घडु शकते याची कल्पना नाना पाटेकर यांना नेमकेपणाने आली होती. साहजिकच आपल्या खास मित्रासाठी नाना पाटेकर जीवावर उदार होऊन पळत होते.
अशोक सराफ यांना पळवतच बाहेर नेलं. रिक्षा किंवा इतर कुठलंच साधन उपलब्ध नसल्याने शेवटी नाना पाटेकर यांनी सायकल रिक्षा स्वत: चालवत अशोक सराफ यांना सुखरूप घरी पोहोचवलं होतं.
अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. अशोक सराफ म्हणाले की "जर त्यावेळी नाना नसता तर आज मी जिवंत नसतो".नाना एक कलाकार म्हणुन मोठे आहेतच पण माणुस म्हणुनही ते मोठे आहेत असंच हा किस्सा ऐकणारा किंवा वाचणारा प्रत्येकजण म्हणेल
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.