Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak

Kangana Ranaut New Film: 'थलायवी'नंतर कंगनाचा आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट

राघव लॉरेन्स सोबत 'या' चित्रपटामध्ये साकारणार मुख्य भूमिका
Published on

Kangana Ranaut in Chandramukhi 2: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'चंद्रमुखी 2 ' असे या चित्रपटाचे नाव आहे. 2005 मध्ये रीलीज झालेल्या रजनीकांत यांच्या हॉरर कॉमेडी चंद्रमुखी या चित्रपटाचा हा सीक्वेल असणार आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटाचा नंतर अक्षयकुमारने भूल भुलैय्या या नावाने हिंदी रीमेक केला होता.

Kangana Ranaut
Mahnaz Mohammadi: इराणी दिग्दर्शिकेने केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये चक्क पाठवले स्वतःचे केस; 'हे' आहे कारण...

लायका प्रोडक्शन हाउसने सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी कंगनाचा फोटो शेअर करत या चित्रपटाशी जोडल्या गेल्याबद्दल कंगनाचे स्वागत केले आहे.

'चंद्रमुखी 2' मध्ये कंगना ही राघव लॉरेन्स याच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटात कंगनाचा रोल एका राजाच्या दरबारातील नर्तिकेचा असणार आहे. या चित्रपटाच्या रीलीज डेटची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

दरम्यान, गेल्या काही काळापासून कंगना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत आहे. यापुर्वी तिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक 'थलायवी'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हती.

Kangana Ranaut
Sulochana Chavan passed away: जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

कंगनाने नुकतेच तिचा आगामी चित्रपट इमर्जन्सी चे शुटिंग संपवले आहे. या पॉलिटिकल ड्रामा असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः कंगनानेच केले आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारीत आहे. इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली होती, त्याविषयीच हा चित्रपट असणार आहे. कंगनाने या चित्रपटात इंदिरा गांधींची भुमिका साकारली आहे. दरम्यान, आगामी काळात कंगनाचे 'तेजस', 'मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंट ऑफ दिद्दा', 'द इन्कार्नेशन : सीता' हे चित्रपट येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com